प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त: ईडीची कारवाई

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

मुंबई – पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भोसले ईडीच्या रडारवर होते. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने ही कारवाई केली असून भोसले यांची पुणे आणि नागपूर मधील जप्त केली आहे.

विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणाता आता ईडीने भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.भोसले यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये विविध कंपन्यांचे शेअर, मालमत्ता, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. अविनाश भोसले आणि कुटुंबियांच्या बँक खात्यात असणारी 1.15 कोटी रुपयांची रक्कम देखील ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल वेस्टिन- पुणे हॉटेल ली मेरिडियन- नागपूर, हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा-गोवा याचा समावेश आहे.

दरम्यान भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करीत 1 कोटी 83 लाखांचा दंड केला होता. 2007 मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्यूटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. यापूर्वी त्यांची मुंबईत चौकशी सुरू होती. आता पुण्यातल्या कार्यालयात ईडीने चौकशी सुरु केली आहे. 2017 साली इन्कम टॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते.

मुंबई 103 कोटीच्या प्लॅटची खरेदी!

अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. अविनाश भोसले यांच्या ‘एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. या फ्लॅटसाठी त्यांनी 103 कोटी 80 लाख रुपये मोजले आहेत.

कोण आहेत अविनाश भोसले

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले तेव्हा रिक्षा चालवण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला. पुढे ते रिक्षा भाड्यानं चालवण्यासाठी देऊ लागले. पुढे अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली आणि अविनाश भोसले रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेऊ लागले. पुढे सासर्‍यांच्या माध्यमातून त्यांना अधिक मोठी काम मिळायला लागली. कॉँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे ते सासरे आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *