पाकिस्तानने भारताविरूद्ध कुठलीही हिम्मत केली तर त्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल: जनरल बिपीन रावत


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)– जम्मू-काश्मीरमध्ये समस्या निर्माण करण्यासाठी पाकिस्तान प्रॉक्सी वॉर  सुरू करत आहे. हे उत्तर सीमेवर विकसित होणार्‍या कोणत्याही धोक्याचा फायदा घेऊन आपल्यासाठी समस्या निर्माण करू शकतो. पण जर पाकिस्तानने भारताविरूद्ध कुठलीही हिम्मत केली तर त्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल, त्यात त्याचे मोठे नुकसान होईल असा इशारा भारताचे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी गुरुवारी पाकिस्तानला दिला. यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत असेही त्यांनी सांगितले.

भारत आणि चीनदरम्यान सुरु असलेल्या सीमा वादाबाबत बोलताना ते म्हणाले, सध्याची परिस्थिती आणि येणाऱ्या काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला तयारी करण्याची गरज आहे.  दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या विरोधात कुठल्याही प्रकारची हिम्मत करणे त्याच्यासाठी महागात पडेल    असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला.

अधिक वाचा  पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत?

सीडीएस जनरल रावत म्हणाले, “भारतीय सशस्त्र सैन्याला सद्य परिस्थितीचा सामना करावा लागेल आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार राहावे लागेल. ते म्हणाले की, भारताला उत्तर आणि पश्चिमी आघाड्यांवर समन्वित कारवाईचा धोका आहे. त्यामुळे याचा आम्हाला आमच्या संरक्षण योजनेत  विचार करावा लागेल.

चीन आणि पाकिस्तानची मिलीभगत आमच्यासाठी संकेत

ते म्हणाले की, आम्ही उत्तर आणि पश्चिम सीमेवरील नवीन निर्माण होणाऱ्या धोक्यांशी सामना करण्यासाठी वैचारिक रणनीती तयार केली आहे.  चीनने पाकिस्तान व्याप्त काश्मीरला (पीओके) दिलेली आर्थिक मदत आणि पाकिस्तानला सतत पुरवले जाणारे लष्करी व मुत्सद्दी सहकार्य हे आम्हाला उच्चस्तरीय तयारी करण्याचे संकेत देत आहेत.

विविध आघाड्यांवर तैनात असलेल्या तीनही भारतीय सैन्य दलाच्या जवानांना अद्याप कोरोना विषाणूची लागण झालेली नाही. सीडीएस रावत म्हणाले, “पुढच्या तैनात असलेले जवान,  विमान उड्डाण करणारे कर्मचारी, समुद्रात आपल्या जहाजांवर तैनात असलेले जवान, यापैकी अद्याप कोणालाही कोरोना विषाणूची बाधा झालेली नाही.

अधिक वाचा  चीनची कारस्थाने सुरूच;चीनच्या या सात लष्करी तळांवर भारताचे अत्यंत बारीक लक्ष

आम्हाला शांतता हवी आहे परंतु धमक्यांना सामोरे जाण्यास तयार

जनरल रावत म्हणाले, आम्हाला आमच्या सीमेपलीकडे शांतता हवी आहे. आम्ही गेल्या काही काळापासून चीनच्या काही आक्रमक कारवायांचे निरीक्षण करीत आहोत.  परंतु, आम्ही त्यांच्याशी सामना करण्यास सक्षम आहोत. ते म्हणाले की आमच्या शत्रू राष्ट्रांकडून सीमेवर उद्भवणार्‍या सर्व धोक्यांशी सामना करण्यास आमची तीनही सैन्यदले सक्षम आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love