कुरुलकर प्रकरणात संघ परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही- बावनकुळे

हरियाणातील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार
हरियाणातील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार

पुणे–गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. एखाद्या कृत्यात संबंधित व्यक्ती सापडली म्हणून त्याचे कुटुंब त्याला जबाबदार ठरत नाही. त्यामुळे कुरुलकर प्रकरणात संघ परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

पाकिस्तानला माहिती पुरविल्याच्या प्रकरणात ‘डीआरडीओ’चे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली. कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याची माहितीही पुढे आली आहे. याकडे बावनकुळे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. अंतिम चौकशी अहवाल आल्याशिवाय फार काही बोलता येणार नाही. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्याचे समर्थक करण्याचा प्रश्नच नाही. मात्र, एखादी व्यक्ती एखाद्या प्रकरणात सापडली म्हणून पक्ष, संघटना, धर्म यास जबाबदार धरता येत नाही. एखादी व्यक्ती एखाद्या समाजविघातक कृत्यात आढळली म्हणून त्याच्या कुटुंबाला आपण जबाबदार ठरवू शकत नाही. म्हणून यात परिवाराला ओढणे चुकीचे आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्राने एक भीष्मपितामह गमावला - दिलीप वळसे पाटील

कुरुलकर यांचे कृत्य हे वैयक्तिक स्वरुपाचे आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. यात ते दोषी आढळले, तर त्यांना नक्कीच कडक शिक्षा केली जाईल. व्यक्ती कोणत्याही धर्माची पक्षाची असली, तरी चूक असेल, तर त्याला शासन होईलच. मात्र, परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही, अशी प -तिक्रिया बावनकुळे यांनी नोंदविली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love