कोरोनाने पतीचे निधन झाल्याने पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या


पुणे(प्रतिनिधी)—कोरोनामुळे संकटामुळे तरुण वयातही मृत्यू होत आहेत. त्यामुळे अचानक धक्का बसून आत्महत्येचे प्रकारही वाढले आहे. पुण्यातील भोसरीजवळील फुलेनगर भागात अशीच दुर्दैवी घटना घडली. पतीचे कोरोनामुळे निधन झाल्याने विरह सहन न झाल्याने पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांची दोन मुले मात्र, पोरकी आल्याने हळहळ व्यक्ती केली जात आहे.

 गोदावरी गुरुबसप्पा खजुरकर (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती गुरुबसप्पा उर्फ प्रकास खाजुरकर (वय ३५) यांचे दोन महिन्यांपूर्वी १८ जुलैला निधन झाले. गुरुबसप्पा हे टिव्ही फिटींग आणि इंस्टॉलेशनचे काम करीत होते. त्यांच्यावरच घराचा उदरनिर्वाह चालत असे. पत्नी गोदावरी या देखील काही कामे करून त्यांना हातभार लावत होत्या. अवघ्या पस्तीसाव्या वर्षात गुरुबसप्पा यांना करोनाने गाठले. त्यांच्यावर उपचार केले जात होते.

अधिक वाचा  डॉ. बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांची विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या

महात्मा फुले नगर वसाहतीतील लोकांनी देखील त्यांना चांगले उपचार मिळावे म्हणून, प्रयत्न केले. मात्र, त्यांचा उपचारादम्यान १८ जुलैला मृत्यूने गाठले. अकरा वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी आणि आई – पत्नी असा परिवार मागे सोडून गुरुबसप्पा गेल्याने कुटुंब रस्त्यावर आले. पतीच्या जाण्याने पुढे करायचे काय हा प्रश्न आ वासून उभा असतानाच विरह सहन होत नसल्याने गोदावरी यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पिंपरी चिंचवड शहरात आत्तापर्यंत १०९५ लोकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. अनेक संसार आणि कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. आई आणि वडील हे जग सोडून गेल्याने ही दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. घरात आता दोन्ही मुलं आणि त्यांची आजी असे कुटुंब आहे.

गोदावरी यांचे माहेरचे लोक आज संध्याकाळी सोलापूर कर्नाटक सीमेवर असलेल्या गावातून शहरात येणार आहेत. त्यानंतर गोदावरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवसेना शहर संघटक सुलभा उबाळे यांनी या दोन्ही मुलांचा पुढील सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. तर या परिसरातील माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे हे या दोन्ही मुलांचं शिक्षण पूर्ण करणार आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love