राळेगण सिद्धी—ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देणे, स्वाामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून त्यानुसार शेतीमालाच्या किमती ठरविणे, या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हा इशारा देतानाच अण्णांनी आपले हे शेवटचे आंदोलन असल्याचेही म्हटले आहे. मात्र, अण्णांच्य या इशाऱ्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. दिल्लीत उपोषण करण्यासाठी अण्णांनी परवानगी मागितली असतानही त्यांना अद्याप केंद्र सरकारकडून कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे परवानगी न मिळाल्यास अण्णा येत्या ३० जानेवारीपासून राळेगण सिद्धीतच बेमुदत उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.Anna will go on a fast in Ralegan Siddhi
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांनी तारीख जाहीर केली नव्हती. आंदोलनासाठी दिल्लीत रामलीला मैदान किंवा अन्यत्र जागा मिळावी, अशी मागणी त्यांनी संबंधित यंत्रणेकडे केली आहे. अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्यांना उत्तर मिळालेले नाही . त्यामुळे संतप्त झालेल्या हजारे यांनी केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणेवरहि टीका केली. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सरकार आपल्याशी सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोपहि त्यांनी केला होता. त्यानंतर हजारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी भाजप नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे.
यापूर्वी ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी हजारे यांची भेट घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही हजारे यांच्या संपर्कात आहेत. असे असले तरी हजारे यांना अद्याप कोणतेहि ठाम आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचा आंदोलनाचा निर्णय ठाम आहे. आत त्यांनी तारीखहि ठरविली आहे. लवकरच ही तारीख ते सरकारला कळविणार असून, दिल्लीत जागा मिळाली नाहि, तर राळेगणसिद्धी येथेच यादव बाबा मंदिरात ते उपोषण करणार आहेत..