मुरलीधर मोहळ यांनी केला भविष्यातील विकसीत , सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प : बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्प पत्राचे प्रकाशन

Muralidhar Mohal made a resolution for a future developed, safe and environment friendly development
Muralidhar Mohal made a resolution for a future developed, safe and environment friendly development

पुणे: भविष्यातील विकसीत , सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्प पत्र बुधवारी प्रकाशित करण्यात आले.

यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, आमदार आशिष देशमुख, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसेचे नेते बाबु वागस्कर,आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनावणे,  लहुजी  क्रांती सेनेचे नितीन वायदंडे, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख अमोल कविटकर, उपस्थित होते.

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सक्षम आणि वेगवान बनविणार.

 नगर रस्ता, सातारा रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता, सोलापूर रस्ता, शिवाजीनगर ते हिंजवडी, तसेच कोथरूड उपनगर या मार्गांवर विस्तारित मेट्रो मार्गांची आखणी व्हावी आणि हे मार्ग जलदगतीने पूर्ण व्हावेत, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

दौंड-पुणे-तळेगाव-लोणावळा ईएमयू, पुणे-दौंड लोकल सेवा आणि नाशिक-पुणे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार. पुणे स्टेशन, शिवाजीनगर, खडकी, हडपसर स्टेशनचा आधुनिक पद्धतीने विकास करणार. – लोहगाव, पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविणार. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’कडे (एनएचएआय) पुणे-नगर रस्त्यावर येरवडा ते शिक्रापूरदरम्यान सहा पदरी उड्डाणपुलाबाबत पाठपुरावा करणार.

अधिक वाचा  लोकसभा निवडणुकीत राज्यात आम्ही 40 च्या पार जाणारच - देवेंद्र फडणवीस

पुणे शहरासाठी संकल्प

 समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने पूर्ण करणार. पुण्यातील जुने तलाव, विहिरी, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणार.नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करून पूर्ण क्षमतेने चालविणार.

  पुण्याभोवतालच्या टेकड्या, वनक्षेत्राचे कसोशीने संरक्षण करणार. वेस्ट टू वेल्थ’च्या माध्यमातून कचर्‍यातून ऊर्जानिर्मिती, खत उत्पादन अशा पर्यावरणपूरक कार्यक्रमांची अंमलबजावणी करणार. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार.

  कचरामुक्त पुण्यासाठी शहराच्या विविध भागांत प्लॉगेथॉन उपक्रम नियमित राबविणार, ई-कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्प उभारणार. सोसायट्या, सार्वजनिक ठिकाणे, व्यावसायिक संकुले येथे सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन देणार. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ (एम्स) पुण्यात उभारण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेनुसार पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार.

महापालिकेचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय’ पूर्ण क्षमतेने सुरू करणार, महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालय उभारणार. रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना होणार्‍या त्रासापासून सुरक्षा मिळावी, याकडे विशेष लक्ष देणार. सुधारित नियमावली वापरून ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’अंतर्गत झोपडपट्टीधारकांना सदनिका देणार.

रिक्षा सेवेसाठी शासकीय पातळीवर ॲप विकसित करणार. विविध कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधीतून तरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम राबविणार. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे क्रीडा विद्यापीठाच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार. विद्यार्थी व शिक्षण संस्थांना पुणे परिसरातील कंपन्या हॉस्पिटल, आयटी सेक्टरसह अन्य उद्योगांशी जोडणार.

संगमवाडी येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळाच्या कामाला गती देणार. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडे वाड्याचे स्मारक होण्यासाठी पाठपुरावा करणार. पुरातत्व खात्याच्या नियमांमुळे वारसास्थळांच्या परिसरातील बांधकामांत अडथळा येऊ नये यासाठी पाठपुरावा करून निश्चित धोरण आखणार.

अधिक वाचा  अखिल भारतीय खाटीक समाज पुणे शहर अध्यक्षपदी शिवाजीराव कोथमिरे यांची एकमताने निवड

पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट पुणे महापालिकेत विलीन करणे व या परिसरातील ‘एफएसआय’ वाढविणे यासाठी पाठपुरावा करणार.

पुण्यातील गणेशोत्सव परंपरा आणि नवतेचा संगम साधत अधिक वैभवशाली होण्यासाठी विचारविनिमय करणार. शहरातील जागांच्या योग्य आणि न्याय्य वापरासाठी धोरण आखणार आहे.

—————–

जनतेचा जाहीरनामा

‘पुणे नेक्स्ट’ या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही पुणेकरांना त्यांच्या अपेक्षा मांडण्यासाठी आवाहन केले होते. यातून हजारो सूचना आल्या. त्यातील काही निवडक सूचनांचा ‘संकल्पपत्रा’मध्ये समावेश केला आहे. यातील सूचना केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था अशा वेगवेगळ्या संस्थांच्या अधिकारकक्षांत येतात. याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न त्या-त्या स्तरावर निश्चितपणे केला जाईल.  

पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर आठवड्यातून एकदा ‘नो व्हेईकल झोन’ उपक्रम राबवावा. काँक्रीट मिक्सर्स आणि जड वाहनांना मुख्य शहरात सकाळी 8.30 ते 10.30 आणि सायंकाळी 5.30 ते रात्री 10 प्रवेश बंदी करावी. महिन्यातील एक दिवस सार्वजनिक वाहने, इलेक्ट्रिक वाहने किंवा सायकलच्या वापरासाठी राखून ठेवावा. प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीने दर तीन महिन्यांतून एकदा वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवावा. टेकड्या, शाळा, सार्वजनिक आस्थापना येथील वृक्षसंवर्धनाची जबाबदारी उद्योग क्षेत्रे, बँका यांनी घ्यावी.सार्वजनिक उत्सवांमधील डीजेचा वापर थांबवावा.स्ट्रीट फूड्सची गुणवत्ता राखण्यासाठी सातत्याने तपासणी व्हावी.

अधिक वाचा  टाळ-मृदंगाचा गजर आणि जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष अशा भक्तिरसाने भारलेल्या वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पाण्याची नासाडी रोखण्यासाठी गळणारे नळ, फुटक्या पाईपलाईन्स, गळते टँकर यांच्यावर अंकुश ठेवावा. केंद्र व राज्य सरकारांच्या मोकळ्या जागांवर वनीकरण कार्यक्रम राबवावा.पाऊस येताच मोठ्या प्रमाणात ड्रेनेज तुंबतात आणि पाणी साचते. यासदंर्भात पावले उचलावीत.सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता प्राधान्याने आणि दर चार तासांनी व्हावी.वारसास्थळांच्या परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ धोरण राबविणार. रामवाडी मेट्रो विमानतळापर्यंत घेवून जाणार असल्याचे संकल्प आखण्यात आला आहे.

       ————————-

पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आखण्यात आला आहे. पायाभुत विकास, पर्यावरण, वाहतुक, नवीन रस्ते, अशा योजनांसाठी प्रयत्न करणार पीएमपीच्या ताफ्यात इलेट्रीक बसची संख्या वाढविण्यात येईल. मेट्रोच्या विस्ताराचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कार्यालय चोवीस तास खुले असणार आहे.

-महायुतीचे उमेदवार, मुरलीधर मोहोळ

———————

पुणे शहराचे प्रश्‍न मोदी सरकारने सोडवले आहेत. मेट्रो, नदीसुधार प्रकल्प, चांदणी चौकाचे प्रश्‍न सोडवण्यात आले आहेत. पुण्यासाठी केंद्र सरकारने इलेट्रीकल बस दिल्या, जायका प्रकल्पासाठी अनुदान देण्यात आले आहे. पुण्याच्या विकासाचे  नियोजन उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

-चंद्रशेखर बावनकुळे ( भाजप प्रदेशाध्यक्ष)

————–

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love