सीरम इनस्टिट्यूट ‘कोविशील्ड’ लसीचा एक डोस केंद्र सरकारला २०० रुपयात का देत आहे? खाजगी बाजारात लसीची किंमत किती असणार?

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरु असलेल्या कोविशील्ड या कोरोनावरील लसीचे केंद्र सरकारकडून काल खरेदीची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास या लशीच्या डोसचे तीन कंटेनर रवाना झाले.  पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस देशभरातील १३ शहरांमध्ये वितरीत केली गेली.  यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.

भारत सरकार सीरमकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एक कोटी १० लाख डोस खरेदी करणार आहे. ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेकाने मिळून विसिकत केलेल्या या लसीची निर्मिती पुणे स्थित सीरम इन्स्टिटयूटने केली आहे. जीएसटीसह लसीच्या प्रत्येक डोसची किंमत २०० रुपये असेल असे सीरम इनस्टिट्यूटचे सीइओ अदर पुनावालांनी स्पष्ट केले आहे तर तरी खाजगी बाजारपेठेत लसीचा एक डोस १ हजार रुपयांना मिळणार आहे असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुनावालांनी सरकारला 200 रुपयाला लसीचा एक डोस देण्यामागील कारण स्पष्ट करताना सांगितले की,   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा देण्यासाठी तसेच आम्हालाही देशातील सामान्य, मागासवर्गीय, गरीब, आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करायची आहे. त्यामुळे सरकारला उत्पादन खर्चात अर्थात २०० रुपयांना ही लस उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. भारत सरकारला यापुढेही आम्ही ही लस अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देऊ. पण त्यावेळी प्रति डोस २०० रुपयांपेक्षा जास्त दर असेल. दर महिन्याला 7 ते 8 कोटी डोस तयार करण्याची क्षमता असून इतर देशांनाही लसीचा पुरवठा करायचा आहे, असंही पुनावालांनी सांगितलं.   

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *