शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच अचानकपणे पॉर्न व्हिडिओ सुरु झाल्याने खळबळ

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच अचानकपणे पॉर्न व्हिडिओ सुरु झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीमध्ये घडला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच पॉर्न सुरू झाल्याची ही मागच्या काही दिवसांतली तिसरी घटना आहे. याबाबत पिंपरीतल्या तीन नामांकित शाळांनी पिंपरी चिंचवड सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. अशा वाढत्या प्रकारांमुळे शाळांपुढे ऑनलाईन शिक्षण सुरक्षित ठेवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीपासून राज्यातल्या शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण देण्यासाठी ऑनलाईन वर्गांचा पर्याय समोर आला. मागचं वर्षभर विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. पण हे ऑनलाईन शिक्षण किती सुरक्षित आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरीतल्या नामांकित शाळेचा ऑनलाईन वर्ग सुरू होता. या वर्गात बाहेरील एक अज्ञात व्यक्ती सहभागी झाली. त्या व्यक्तीने वर्ग सुरू असताना त्यात पॉर्न व्हिडीओ सुरू केला. त्यामुळे शिक्षकांना ऑनलाईन क्लास बंद करावा लागला. पिंपरीतल्या तीन शाळांच्या बाबतीत अशीच घटना घडली. त्यानंतर शाळेने संबंधित व्यक्तीविरोधात सायबर सेलकडे तक्रार केली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *