राज्य शासनाची 2 लाख पदे रिक्त आहेत तर हे सरकार झोपले आहे का?- अमित ठाकरे : स्वप्नील लोणकर कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झाल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान, राज्य शासनाची 2 लाख पदे रिक्त आहेत तर हे सरकार झोपले आहे का? असे काहीतरी घडल्यानंतरच पाऊल उचलण्यासाठी सरकारला येणार का असा सवाल अमित ठाकरे यांनी केला.

अमित ठाकरे यांनी आज केडगाव येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी आपली व्यथा अमित राज ठाकरे यांच्यासमोर मांडली. स्वप्नीलच्या जाण्याने लोणकर कुटुंबीयांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. इतर स्वप्नील वाचवा, सरकारने एमपीएससीच्या मुलांना न्याय द्यावा, सरकारने फक्त मुलांना आमिष दाखवू नये, फक्त घोषणा करू नयेत तर त्यावर तत्काळ कार्यवाही करावी आणि एमपीएससीच्या मुलांना न्याय द्यावा, अशी भावना स्वप्नीलच्या आई वडिलांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना अमित ठाकरे म्हणाले, एमपीएससीच्या मुलांना न्याय मिळाला तर तो स्वप्नील मुळेच मिळेल. तसेच सर्वतोपरी मदत लोणकर कुटुंबीयांना करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

स्वप्नीलच्या कुटुंबीयांना मदत मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांचा धनादेश देत मदत केली आहे. तसेच कोणत्याही प्रकारची मदत लागली तर केव्हाही संपर्क साधा, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *