रेणू शर्मा यांनी यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, काय म्हणाले अजितदादा?


पुणे- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटले होते आणि खळबळ उडाली होती. विरोधकांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकता म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.

माजी आमदार व सध्याचे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी पोलीस तक्रार दाखल केली होती . ‘रेणू शर्मा ही ‘हनी ट्रॅप’ लावून प्रतिष्ठित व्यक्तींना ब्लॅकमेल करणारी महिला आहे असे म्हटले होते तर मनसेचे मनीष धुरी यांनी रेणू शर्मा यांनी अनेकवेळा आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आस आरोप केला होता. त्यांनतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असून पक्षाला त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल’ या केलेल्या वक्तव्याबाबत युटर्न घेत सत्य समजल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात अर्थ नाही असे म्हटले होते.

अधिक वाचा  पंजाब - हरियाणाच्या शेतकऱ्यांना हे सांगूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही -शरद पवार

त्यानंतर रेणू शर्मा या महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, “धनंजय मुंडे यांना या प्रकरणात आम्ही पाठीशी घालत असल्याचे आमच्यावर आरोप झाले. आम्ही पहिल्यापासून तपास पूर्ण होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या असं म्हणत होतो. मात्र, या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची नाहक बदनामी झाली आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र, ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यांच्याविरुद्ध वक्तव्ये केली त्यांना आता उत्तर मिळाले असेल असं म्हणत बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी नेता बदनाम होतो. अशा वेळी त्याचे कुटुंबही व्यथित होते. अशा चुकीच्या गोष्टींना जबाबदार कोण? अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा त्या नेत्याला एक क्षणात पायउतार व्हावं लागतं, याचा जरा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे”,असे अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love