राजेंद्र जगताप व अरुण पवार यांच्यावतीने अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा :पिंपळे गुरवमध्ये वृक्षारोपण, अंध अपंगांना धान्य वाटप


पिंपरी(प्रतिनिधी)–महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव  येथे वृक्षारोपण, ममता अंध-अपंग केंद्राला अन्नधान्य वस्तू वाटप, किक बॉक्सिंग स्पर्धा, कर्मवीर पाटील वाडा खेड या शाळेला शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. याबरोबरच किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मा.अजित गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर कार्याध्यक्ष श्याम जगताप, उद्योजक बालाजी पवार, सामाजिक न्याय विभागाचे  शहराध्यक्ष बाळासाहेब पिलेवार, प्रभाग क्र. 44 च्या अध्यक्षा इंद्रायणी देवकर, प्रभाग क्रमांक 44 चे अध्यक्ष जावेद शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप, रवींद्र बाईत, उद्योजक शंकर तांबे, सामाजिक कार्यकर्ते रोहित जाधव, संजीवनी पुराणिक, सोमनाथ दाते, तुषार कांबळे, अमोल लोंढे, सखाराम वालकोळी, श्याम लांडे, संतोष जगताप, नागनाथ लोंढे, सुधाकर पवार, हरिश्चंद्र तरटे, विजया नागटिळक, स्टीफन सिंग, नागेश जाधव, महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंगचे सचिव सचिन शिंगोटे (पंच),राहुल निकम (पंच), अश्विनी बिराजदार (पंच), हर्षद गुंड (प्रशिक्षक),रामन थापा (प्रशिक्षक) अथर्व मेंगडे (प्रशिक्षक) विवेक मंडल (प्रशिक्षक)वैष्णवी मटकर, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ, संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  शिवजयंती सोहळा किल्ले शिवनेरीवर उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love