अजित पवार आगामी विधानसभा खडकवासला मतदारसंघातून लढविणार? हे आहे कारण….

Ajit Pawar will contest the upcoming assembly from Khadakwasla constituency
Ajit Pawar will contest the upcoming assembly from Khadakwasla constituency

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचा  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदार संघातून (Maval Constituency) पराभव झाल्यानंतर अजित पवार, पार्थ पवार यांना सक्रिय  राजकारणामध्ये ‘री लॉन्च’ (Re Launch) करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून धडपड करत आहेत. (Ajit Pawar will contest the upcoming assembly from Khadakwasla constituency?)

 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पार्थ पवार यांना मावळ मतदार संघातून लोकसभेचे उमेदवारी देण्यावरून पवार कुटुंबात वाद  निर्माण झाला होता.  शरद पवार (Sharad Pawar) यांचा पार्थ पवार यांच्या उमेदवारीला त्यावेळी विरोध होता.  पवार कुटुंबातून कोणीतरी एकच जण निवडणूक लढवेल असे त्यांनी सांगितले होते.  मात्र तरीही अजित पवार  आणि पार्थ पवार यांच्या आग्रहाखातर पार्थ पवार यांना मावळातून उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

अधिक वाचा  पुणे शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड

मावळातून पराभव झाल्यानंतर पार्थ पवार यांनी भाजपला समर्थन देणारी भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.  या कार्यक्रमानंतर पार्थ पवार यांनी राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देत ‘जय श्रीराम चा जयघोष करणार ट्विट केलं होतं.  त्यावरूनही शरद पवार यांनी  पार्थ पवार यांना अपरिपक्व म्हणत  त्यांच्या मताला फार किंमत नसल्याचे म्हणत टोकलं होतं. त्यानंतरही पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरून राजकारण सुरू असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी निवेदन देऊन केली होती. शरद पवार यांनी पार्थ पवारांना फटकारलं असताना अजित पवार यांनी मात्र याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. 

अधिक वाचा  सुनेत्रा पवार राज्यसभेवर : भुजबळांची नाराजी

अजित पवार यांची राष्ट्रवादीमध्ये  कोंडी झाल्याने त्यांच्या मनामध्ये असतानाही ते पार्थ पवार यांना सक्रिय राजकारणात आणू शकत नव्हते.  शेवटी अजित पवार  काका शरद पवार यांच्या विरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले आणि तेव्हापासून पुन्हा एकदा पार्थ पवार हे सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. 

अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये आपल्या शिलेदारांसह सामील होऊन  उपमुख्यमंत्री झाल्यानंतर,  गेल्या २६ ऑगस्ट २०२३ रोजी बारामतीमध्ये त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.  या नागरी सत्कार सोहळ्यापूर्वी बारामती मध्ये अजित पवार यांची भव्य रॅली काढण्यात आली.  त्यावेळी पार्थ पवार यांनी वडिलांची पाठ सोडली नाही.  या संपूर्ण यात्रेमध्ये पार्थ पवार हे अजित पवारांच्या पाठीमागे उभे होते.  त्याचवेळी अजित पवार यांनी या रॅलीच्या माध्यमातून पार्थला सक्रिय राजकारणात ‘री लाँच’  केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.  या रॅलीनंतर झालेल्या सत्कार सोहळ्याच्या वेळी व्यासपीठावर देखील अजित पवार आणि  युवा नेता पार्थ पवार असाच जयघोष सुरू होता. 

अधिक वाचा  तर.. नरेंद्र मोदी काय चीज आहे?- शरद पवार

या सर्व घटनेनंतर आता राजकीय वर्तुळात एका चर्चेला उधाण आले आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये  बारामती विधानसभा मतदारसंघात  उमेदवारी देऊन अजित पवार स्वतः भाजपच्या पाठिंब्याने पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पार्थ पवार यांचे राजकीय करिअर करण्यासाठी बारामती विधानसभा मतदार संघ मोकळा केला जाणार असल्याची चर्चा आहे. बारामती पार्थला देऊन अजित पवार हे खडकवासला मतदार संघातून भाजपच्या पाठिंब्यावर लढणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love