Jitendra Shinde, the main accused in the Kopardi rape and murder case, committed suicide in Yerawada jail

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याची येरवडा कारागृहात आत्महत्या

क्राईम महाराष्ट्र
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)—महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नगर जिल्ह्यातील कोपर्डी (Kopardi) बलात्कार (Rape) आणि हत्या (Murder) प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (Jitendra Shinde) (वय ३१, रा. कोपर्डी, ता. कर्जत) याने रविवारी पहाटे येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. (Jitendra Shinde, the main accused in the Kopardi rape and murder case, committed suicide in Yerawada jail)

आरोपी जितेंद्र शिंदे याने आज पहाटेच्या सुमारास गळफास घेतल्यानंतर काही वेळातच ही माहिती तुरुंग प्रशासनाला कळाली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली. तुरुंग अधिकारी अमिताभ गुप्ताही थोड्या वेळातच येरवडा कारागृहात पोहोचणार आहेत. दरम्यान, आरोपी जितेंद्र शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे.

शिंदे हा सुमारे पाच वर्षांपासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता. कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना नगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २०१७ ला दोषी ठरवलं होतं. शिंदेचे आई- वडील मजुरी करतात. तोही मजुरी करून पोट भरत होता. तो गावातीलच वीटभट्टीवर काम करीत होता. घटनेच्या अगोदर चार दिवस वीटभट्टीचालकांकडून त्याने उचल घेऊन नवीन दुचाकी खरेदी केली होती. याच दुचाकीवरुन फिरताना पीडितेच्या भावाने त्याला घटनास्थळी पाहिले होते आणि पुढे याचाच धागा पकडून तो पकडला गेला.

१३ जुलै २०१६ रोजी कोपर्डीतल अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण खून करण्यात आला. त्यातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे आहे. त्याला घटनेनंतर पोलिसांनी श्रीगोंद्यातून अटक केली. त्यानंतर इतर आरोपींना  अटक करण्यात आली.  त्यांच्याविरूद्ध जिल्हा न्यायालयात आरोपपत्र पाठविण्यात आले होते. या प्रकरणातल्या तीनही आरोपींना २९ नोव्हेंबर २०१७ रोजी अहमदनगरच्या विशेष न्यायालयानं दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिवाय तिघांनाही २० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

त्यानंतर आरोपी संतोष भवाळ याने या शिक्षेला मुंबईत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हाने दिले. तर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सरकारच्यावतीनेही उच्च न्यायालयात प्रकरण नेण्यात आले आहे. आरोपी भवाळ याने मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून हे संपूर्ण प्रकरण औरंगाबादहून मुंबईला वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यानुसार हे प्रकरण मुंबईला वर्ग झाले. सध्या खटल्याची सुनावणी प्रलंबित आहे. या काळात तिन्ही आरोपींनी येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे.

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची अहमदनगर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा दिली होती. यावेळी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारच्यावतीने पीडितेची बाजू मांडली होती.

दरम्यान, आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी कोपर्डीत वेळोवेळी आंदोलने झाली. आता जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना कोपर्डीतूनही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामध्येही या आरोपींनी तातडीने फाशी द्यावी, ही मागणी करण्यात आली. काल सायंकाळीच प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे चक्री उपोषण मागे घेण्यात आले आहे. त्यानंतर आज सकाळी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुख्या आरोपीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *