सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधे कृष्ण ग्रुपने फोडली 

Suvarnayug Tarun Mandal's Dahihandi was broken by Radhe Krishna Group of Kasba Peth
Suvarnayug Tarun Mandal's Dahihandi was broken by Radhe Krishna Group of Kasba Peth

पुणे : बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची (Suvarnayug Tarun Mandal) दहीहंडी (Dahihandi) कसबा पेठेतील राधे कृष्ण ग्रुप (Radhe Krishna Group) दहीहंडी संघाच्या गोविंदांनी ७ थर लावून फोडली. गुरुवारी रात्री ८ वाजून ५५ मिनीटांनी अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. विराज कांबळे या बालगोविंदाने हंडी फोडली. (Suvarnayug Tarun Mandal’s Dahihandi was broken by Radhe Krishna Group of Kasba Peth)

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील (Lakshmibai Dagdusheth Halwai Dutt Temple) जय गणेश प्रांगण येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, तुषार रायकर यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन

पुण्याच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षक असलेल्या  सुवर्णयुग तरुण मंडळाचा दहीहंडी उत्सव पाहण्याकरिता गोपाळ भक्तांनी मोठी गर्दी झाली होती. यंदाच्या वर्षी साकारण्यात आलेला श्रीकृष्ण – कालियामर्दन असा भव्य ३० फूट उंचीचा एलईडी लाईट हलता देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

कसबा पेठेतील राधे कृष्ण ग्रुप दहीहंडी पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला रुपये ५१ हजार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  मच गया शोर… काठीन घोंगड घेऊ द्या… सुनो गौरसे दुनियावालो… जय श्रीराम… यांसारख्या पारंपरिक गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव साजरा केला. सुरुवातीला सायंकाळी ढोल ताशा वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करुन उपस्थितांना ठेका धरायला लावला. पुण्यासह इतर शहरांतून गोविंदा पथके दहिहंडी फोडण्याकरीता आली होती, असे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love