एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं काही कारण नाही : अजित पवारांनी सुनावले

पुणे–पुण्याचे खासदार गिरीश बापट (girish bapat) यांचे निधन होऊन दोन दिवस उलटत नाही तोच त्यांच्या जागेवर कोण खासदार होणार यावर भाजप आणि विरोधी पक्षाकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी,(ajit pawar) “आपल्यात जरा माणुसकी राहू द्या,एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं काही कारण नाही” अशा शब्दांत सत्ताधारी व विरोधी पक्ष अशा दोघांनाही सुनावले आहे. […]

Read More

अजित पवार यांनी देशातील नागरिकांची आणि हिंदू धर्मीयांची माफी मागावी

पुणे–औरंगजेबांना मानणाऱ्या लोकांच्या मताच्या हव्यासापोटी अजित पवारांनी छत्रपती संभाजी माहाराज हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य केले. अजित पवारांना इतिहासात नाक खुपसण्याची काहीच गरज नाही, जे मुळातच हिंदू विरोधी आहेत. त्यामुळे त्यांनी देशातील नागरिकांची आणि हिंदू धर्मीयांची माफी मागावी, अशी मागणी पुण्यातील भाजप युवा मोर्चाच्यावतीनं करण्यात आंदोलनात भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित […]

Read More

ओबीसी,मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजपा आमदारांचे निलंबन : भाजपचे आंदोलन

पुणे- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत सरकारचा नाकर्तेपणा दाखवून दिल्यामुळे सरकारने खोटे आरोप लावून भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. मागील दीड वर्षात महाविकास आघाडी सरकार कोणत्याही प्रकारे विधायक कार्य करू शकले नाहीत. ह्या निराशेतून काल विधानसभेमध्ये जनतेच्या न्याय्य हक्कासाठी आग्रही असणाऱ्या भाजपाच्या […]

Read More

पुणेकरांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडले

पुणे-सलग दोन दिवस पुणे शहराला रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा झालेला नाही. शहरातील रोजची इंजेक्शनची मागणी किमान अठरा हजार इतकी असूनही शहराला पुरेसा पुरवठा नाही, हे अत्यंत गंभीर आहे. यावर सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात म्हणून पुणे शहर भाजपने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. पुणेकरांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप […]

Read More

मिनि लॉकडाउनच्या नावाखाली संपूर्ण लॉकडाउन: कायदेभंग करण्याचा भाजपचा इशारा

पुणे-मिनि लॉकडाउनच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने शहरात संपूर्ण लॉकडाउन केला असून, त्यामुळे पुणेकरांचे जीवनमान ठप्प होणार असून, शहराची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांमध्ये एक नियम आणि पुण्यात वेगळा नियम हे अन्यायकारक आहे. पुण्यात लादलेले नियम तातडीने शिथिल करावेत आणि राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी जारी केलेली नियमावली लावावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि […]

Read More

पीएमपीएमएल बससेवा सुरु करा – भाजपचे आंदोलन: गिरीश बापट आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे—पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा (पीएमपीएमएल बससेवा) सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला भाजपने विरोध केला असून आज पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी भाजपाचे खासदार गिरीश बापट आणि […]

Read More