पूजा चव्हाणचे वडील म्हणतात शांताबाई आमच्या नातेवाईक नाहीत: तृप्ती देसाईंनी केली वंशावळ प्रसिद्ध


पुणे—पुण्यातील पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरण दाबण्यासाठी  पूजाच्या आई वडिलांना माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून 5 कोटी रुपये मिळाले असल्याचा खळबळजनक आरोप पूजाची चुलत आजी शांताबाई चव्हाण यांनी केल्यानंतर पूजाचे वडील लहुदास चव्हाण मात्र यांनी हे आरोप फेटाळत शांताबाई या आमच्या नातेवाईक नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिक वाढली आहे. तर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शांताबाई राठोड उर्फ शांता चव्हाण यांची वंशावळ सोशल मिडियावर प्रसिद्ध करून शांताबाई राठोड या पूजाची चुलत आजी असल्याचे म्हटले आहे.

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर काल पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आमच्या मुलीच्या प्रकरणात संपूर्ण तपास व्हावा व तिला न्याय मिळावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. केवळ संशयावरून कोणाचे नुकसान होऊ नये, अशी भावनाही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडं व्यक्त केली होती. या भेटीनंतर शांताबाई राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांवर पैसे घेऊन प्रकरण मिटवत असल्याचा आरोप केला आहे. ‘पूजाच्या आई-वडिलांना लेकराची किंमत नाही. मी चुलत आजी आहे. त्यामुळं माझं कोणी ऐकणार नाही. पण त्यांनी समाजाची दिशाभूल केली आहे. आता मुख्यमंत्र्यांचीही दिशाभूल करत आहेत. पूजाचे आई-वडील खोटं बोलत आहेत. संजयभाऊ राठोड यांनी ५ कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड बंद केलं आहे. आमची मुलगी चांगली होती असं ते कधीच म्हणणार नाहीत,’ असंही शांताबाई म्हणाल्या.

अधिक वाचा  नितीश कुमारांचे भाजपशी काडीमोड घेण्यामागे खरे कारण काय? सुलतान गंजचा कोसळलेला पूल की बिहार जमुई मध्ये सापडलेली सोन्याची खान?

त्यावर पूजाचे वडील लहुदास चव्हाण यांनी, “ कोण काय बोलतय  ते माहिती नाही. आम्ही आमच्या दुखा:त आहोत असे संगत शांताबाई राठोड या आमच्या नातेवाईक नसल्याचे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना सांगूनही बदनामी थांबली नाही खंत व्यक्त करीत शांताबाई या लांबच्या नातेवाईक, मात्र कसलेच नातेसंबंध असल्याचे म्हटले असल्याचे टीव्ही9 मराठी या वाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान आज तृप्ती देसाई यांच्या सोबत त्यांनी आज पुणे शहर गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांची भेट घेऊन पूजा चव्हाण प्रकरणात लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली असून तृप्ती देसाई यांनी शांताबाई यांची वंशावळ सोशल मिडियावर शेअर केली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love