Kirit Somaiya: शरद पवार कुटुंबाने (Sharad Pawar Family) सीरम इन्स्टिट्यूटकडून (Serum Institute) कोविड(Covid) काळात ४३५ कोटी रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. शरद पवार यांचे कुटुंबीय प्रतापराव पवार(Prataprao Pawar) यांनी स्थापन केलेल्या ‘न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्राइवेट लिमिटेड’( NEW STAR INFRA PROJECT PRIVATE LIMITED) या कंपनीत सीरम इन्स्टिट्यूटकडून ((Serum Institute) आलेल्या ४३५ कोटी रुपयांच्या रक्कमेविषयी रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे ( Registrar of Companies) माहिती नाही. या रकमेच्या संदर्भात पवारांनी खुलासा करावा अशी मागणी सुद्धा सोमय्यांनी केली आहे. (Sharad Pawar family recovered Rs 435 crore from Serum Institute during Covid)
सोमय्या यांनी आकुर्डीतील कंपनी नोंदणी कार्यलयाला आज सोमवारी भेट दिली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार अश्विनी जगताप, सदाशिव खाडे, अमित गोरखे, नामदेव ढाके, राजू दुर्गे आदी उपस्थित होते.
सोमय्या म्हणाले, पैसे कसे ढापायचे हे शरद पवार यांचे कुटुंब जगाला शिकवू शकते. कोविड काळात वसुलीचा धंदा सुरू होता. ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचा बारा वर्षांत एका दमडीचा व्यवसाय नाही. अचानक मार्च २०२१ मध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या बँक खात्यातून ४३५ कोटी शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या कंपनीत आले आहेत. यांचं काॅन्ट्रिब्यूशन किती? केवळ एक लाख. मग, त्यांच्या खात्यात जमा झालेले ४३५ कोटी हे कमिशन आहे का? असा प्रश्न भाजप नेते सोमय्या यांनी सोमवारी उपस्थित केला. दरम्यान, दिल्लीला जाऊन याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
मार्च २०२१ मध्ये ४३५ कोटी रुपये सीरम इन्स्टिट्यूटने प्रतापराव पवारांच्या कंपनीला दिले. या ४३५ कोटींपैकी ३०० कोटी रुपये प्रतापराव पवार यांनी आपल्या दुसऱ्या कंपनीत वळवले. याची पूर्ण चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाने आणि ईडीने करावी. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याचं मान्य केलं आहे असंही किरीट सोमय्या म्हणाले. हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर पवार परिवाराने १०० कोटींचा दावा ठोकण्याची मला धमकी दिली. या ४३५ कोटी रुपयांचा हिशोब द्या. या वसुलीचा जबाब पवार कुटुंबाला द्यावा लागणार असंही सोमय्या म्हणाले.
टीडीआर घोळ्यासंदर्भात उडवाउडवी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दीड हजार कोटी रूपयांच्या कथित टीडीआर घोटाळ्यासंदर्भात विचारल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देत काढता पाय घेतला.
मी ज्या- ज्या तक्रारी केल्या, त्यामध्ये १०० टक्के तथ्य आढळले. मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रकरण न्यायालयात चालू आहे. पुढच्या निर्णय न्यायालयाने घेणे अपेक्षित आहे. न्यायालयापर्यंत पोहचविण्याचे माझे काम आहे. खासदार भावना गवळी यांच्या सव्वा आठ कोटींची आयकर विभागाने मालमत्ता अँटँच केलीआहे, असेही ते म्हणाले.