सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांना अभाविपचा घेराव


पुणे(प्रतिनिधी)— कोरोनाची पार्श्वभूमी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर ओढवलेले आर्थिक संकट आणि विद्यापीठ प्रशासनाकडून चाललेला हलगर्जीपणा यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.   संतप्त विद्यार्थ्यांनी आज विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांना घेराव घातला.

अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठाने परत करावे ,टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या शुल्कामध्ये ३० टक्के कपात करण्यात यावी,प्रवेश नोंदणी करत असताना एकूण शुल्काच्या जास्तीत जास्त १५% शुल्क आकारण्यात यावे व इतर शुल्काचा चार टप्प्यांमध्ये घ्यावेत ,अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुका आढळून येत आहेत अशा विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन करून निकाल घोषित करण्यात यावे, तसेच कोरोना महामारीमुळे वसतिगृहा मधील सर्व विद्यार्थी आपापल्या गावी गेले असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे वसतिगृह शुल्क विद्यापीठाने त्वरित परत करावे अशा विविध मागण्यांच्या आशयाचे पत्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांच्या वतीने कुलगुरूंना देण्यात आले.

अधिक वाचा  पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास आजपासून सुरुवात

 यावेळी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची गाडी अडवून कुलगुरू आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन  विद्यापीठाच्या विरोधात असलेला आपला रोष  दाखवून दिला यामुळे कुलगुरूंना पायीच निघून जावे लागले.

विद्यापीठाचे रजिस्टार प्रफुल्ल पवार यांनी या सर्व मागण्यांवर अधिकार मंडळाची बैठक बोलावून येत्या ०७ दिवसात सकारात्मक चर्चा करून विद्यार्थी हितार्थ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे , त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. येत्या ०७ दिवसात विद्यार्थी हिताचा निर्णय आला नाही तर अधिक तीव्र पद्धतीने पुण्यासह सर्व महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे व महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी यावेळी दिला आहे .

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love