राजकीय फायदा नसल्याने आमच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिले जात नाही का?

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे– सुशांतसिंह हा सेलेब्रेटी होता त्यामुळे त्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आणि आम्ही सामान्य नागरिक आहोत, आमच्या प्रकरणाचा राजकीय फायदा नसल्याने आमच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जात नाही का असा उद्विग्न सवाल पुण्यातील एका सामान्य कुटुंबातील आयुर्वेद डॉक्टर चैत्राली कुलकर्णी हिच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तिच्या पालकांनी केला आहे. कॉलेजच्या प्रमुखांचे राजकीय लागेबांधे आहेत. महाराष्ट्रातील बड्या राजकीय दबावामुळे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत नसल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे. त्याचबरोबर सुशांतसिंह प्रमाणे चैत्रालीच्या मृत्यूची चौकशीही सीबीआय मार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

चैत्राली हिचा चार वर्षांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. पण, अद्याप तिच्या मृत्यूची चौकशी होऊन तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी तिचे कुटुंबीय करत आहेत.  

चैत्राली कुलकर्णी ही वाघोली येथील एका महाविद्यालयात एमडीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. महाविद्यालयात गैरप्रकार चालतात हे चैत्रालीला कळल्यावर तिने याविरोधात आवाज उठवला आणि त्यानंतर २०१६ तिचा संशयास्पद मृतदेह खडकवासला धरणात तरंगताना आढळला. मात्र, यानंतर या संपूर्ण प्रकरणाची दखल घेण्यास पोलिसांनी तब्बल ११० दिवस लावले आणि त्यानंतर तक्रार नोंदवली.

आधी पोलिसांनी आणि त्यांनतर सीआयडीकडे तपास गेल्यानंतरही चैत्रालीच्या मृत्यूचे गूढ उकललेले नाही. चैत्राली ज्या महाविद्यालयात ती शिकत होती. त्या कॉलेजच्या प्रमुखांचे महाराष्ट्रातील बड्या राजकीय व्यक्तीशी लागेबांधे आहेत. दबावामुळे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत नसल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे. त्याचबरोबर सुशांतसिंह प्रमाणे चैत्रालीच्या मृत्यूची चौकशीही सीबीआय मार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *