आदिवासी विद्यार्थी शासकीय वसतीगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न केल्याने अभाविपचे आंदोलन

ABVP's agitation for not hoisting the flag on Independence Day in tribal student government hostel
ABVP's agitation for not hoisting the flag on Independence Day in tribal student government hostel

पुणे- पुण्यातील वाकड परिसरातील आदिवासी विद्यार्थी शासकीय वसतीगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याचा निषेध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज आंदोलन करून वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी केली. (ABVP’s agitation for not hoisting the flag on Independence Day in tribal student government hostel)

भारतीय स्वातंत्र्य दिन हा सर्व देशवासीयांसाठी गौरवाचा आणि अतिशय आत्मियतेचा विषय आहे.  स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण होत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी देखील तीन दिवसीय ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करण्याचे आवाहन संपूर्ण देशवासीयांना केले होते.  या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालयांमध्येही स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठा उत्साह दिसला.  एकीकडे संपूर्ण देश हा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील वाकड परिसरात असलेल्या आदिवासी विद्यार्थी शासकीय वस्तीगृहाच्या गृहपालांनी वसतीगृहामध्ये ध्वजारोहण करण्याची तसदी देखील घेतली नाही.

अधिक वाचा  राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने स्वप्नील लोणकरचा बळी घेतला - अभाविपचे आंदोलन

आपल्याकडे खांब नाही,दोरी नाही, ध्वज लावण्याची आवश्यकता नाही अशी हास्यास्पद व उडवाउडवीची उत्तरे त्यांनी आपल्या वस्तीगृहात ध्वजारोहण का करत नाही?  असे विचारणाऱ्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना दिली.  एवढेच नव्हे तर वसतिगृहाचे गृहपाल घोरपडे वसतीगृहाच्या परिसरात स्वातंत्र्यदिनी फिरकले सुद्धा नाहीत असा आरोप अभावीपणे केला आहे.

या विषयाची माहिती जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मिळाली तेव्हा अभाविपचे कार्यकर्ते या वसतिगृहाच्या गृहपालांशी बोलायला गेले.  मात्र गृहपालांनी विद्यार्थी कार्यकर्त्यांशी बोलणे देखील टाळले. असा आरोप महानगर मंत्री सिद्धेश लाड यांनी यावेळी केला.

अभाविपचे  पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यावेळी म्हणाले की, संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साह दिसून येत होता.  ध्वजारोहण तिरंगा पदयात्रा, रॅली, आयोजित करण्यात आल्या होत्या.  मात्र वाकड येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतीगृहामध्ये मात्र ध्वजारोहण करण्यात आले नाही ही बाब अत्यंत लांछनास्पद आहे.  आपली जबाबदारी जर कोणी अधिकारी झटकत  असेल तर त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी अभाविप सडेतोड उत्तर देईल.  या वस्तीगृहाच्या संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी अभाविप  करते आहे.

अधिक वाचा  जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये अग्निशमन दलाची प्रात्यक्षिके : विद्यार्थीनींनी देखील मोठ्या उत्साहाने घेतला सहभाग

 या आंदोलनामध्ये अभाविपचे  पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री आनंद भूसणार, पुणे ग्रामीण विभाग संयोजक अनिकेत शेळके, पिंपरी चिंचवड महानगर मंत्री सिद्धेश लाड, सहमंत्री श्रेया चंदन व इतर विद्यार्थी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love