Devarshi Narada Journalism Award

जेष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, अरुण मेहेत्रे, सुषमा नेहरकर, आशुतोष मुगळीकर यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार जाहीर

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे, दि. १७ ऑगस्ट :- विश्व संवाद केंद्र (Vishwa Sanvad Kendra) आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी (Deccan Education Society) यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार (Devarshi Narada Journalism Award) नगरचे दिव्यमराठीचे (Divya Marathi) ब्युरो चीफ अनिरुद्ध देवचक्के(Aniruddha Deochakke), झी २४ तास या वाहिनीचे पुणे ब्युरो अरुण मेहेत्रे (Arun Mehetre) , सुषमा नेहरकर(Sushma Neherkar), आशुतोष मुगळीकर(Ashutosh Mugalikar) यांना जाहीर झाला आहे. पुरस्कारांचे वितरण शनिवार, दि. १९ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, माध्यमांचे अभ्यासक आणि प्रखर राष्ट्रवादी विचारक शहजाद पूनावाला (Shahajad Poonavala) यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये एका विशेष समारंभात होणार आहे. यावेळी शहजाद पूनावाला यांचे ‘समाजमाध्यम आणि डिजिटल मीडिया युगातील पत्रकारिता’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्यूकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्करांची घोषणा केली. याप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ परिषद सदस्य मिलिंद कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे असतील. या समारंभास माध्यम क्षेत्रातील पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विश्व संवाद केंद्र आणि  डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.

अभय कुलकर्णी  पुढे म्हणाले की, या  पुरस्कार उपक्रमाचे हे १२ वे वर्ष असून देवर्षी नारद  यांच्या नावे हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप ज्येष्ठ पत्रकार यांना २१ हजार रुपये तर अन्य तीन पुरस्कार ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे राहील.

यापूर्वी हे पुरस्कार ’ए बी पी माझा’चे संपादक राजीव खांडेकर,  ’झी२४ तास’चे डॉ. उदय निरगुडकर, ’तरुण भारत’ बेळगावचे संपादक किरण ठाकूर, ’दिव्य मराठी’चे संपादक प्रशांत दीक्षित, ’महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक पराग करंदीकर, ’लोकसत्ता’ पुण्याचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ पत्रकार कै. दिलीप धारूरकर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर  ’आज का आनंद’चे संपादक श्याम अग्रवाल,ज्येष्ठ पत्रकार अभिजित अत्रे, नाशिकच्या देशदूतच्या संपादक वैशाली बालाजीवाले आदींना देण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी डॉ. रवींद्र आचार्य यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विविध माध्यमांच्या क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या  शिक्षणाच्या संधी आणि  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्वायत्त डीईएस पुणे विद्यापीठ याविषयी माहिती दिली.

राष्ट्रीय विचारांनी  प्रेरित विश्व संवाद केंद्राचे देशभर कार्य असून विविध राज्यातून ३० केंद्र कार्यरत आहेत. पुण्यातील केंद्राची स्थापना २०१४ झाली असून पश्चिम महाराष्ट्र हे केंद्राचे कार्यक्षेत्र आहे. विश्व संवाद केंद्र राष्ट्रीय विचारांच्या प्रसार-प्रचाराचे कार्य करते. त्यासाठी केंद्रातर्फे माध्यमांशी माहितीची देवाणघेवाण करून समन्वय ठेवला जातो. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *