History of mergers of Pawar since 1977

२०२४ पर्यंत विरोधकांचे मत अन् मनपरिवर्तन – बावनकुळे

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

नागपूर : उद्याही निवडणुका झाल्या तरी महायुतीची तयारी आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, २०२४ पर्यंत महाराष्ट्रात विरोधकांचे मोठ्या प्रमाणात मन आणि मतपरिवर्तन झालेले दिसेल. (Opinion and change of opinion of the opposition till 2024)

नागपुरात त्यांनी पत्रकारांना सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदीजींच्या संकल्पाला जनतेची साथ मिळेल. जसंजसे दिवस २०२४ कडे जातील तसंतसे ५१ टक्के मते भाजपा व महायुतीला मिळतील व निवडणुकीत मताची टक्केवारी वाढेल. नेत्याचा ओघही भाजपाकडे येईल. त्यांना समावून घेण्याची क्षमता भाजपात आहे.

मोदी लोकशाहीसाठी पोषक

आमदाराच्या घरात आमदार व खासदाराच्या घरात खासदार व्हावा ही संस्कृती योग्य नाही. कर्तृत्वशून्य असताना त्यास आमदार करावे हा आग्रह असतो तो मोडून काढण्यासाठी मोदीजींनी लोकशाहीला पोषक असे अनेक निर्णय घेतले. प्रत्येक जिल्ह्यात एक महिला महामंत्री असावी, युवकांना संधी मिळावी जेणेकरून युवक राजकारणात येऊन तर तो देशाकरिता राजकारणात काम करेल. मी आणि माझा मुलगा ही उद्धव ठाकरे याचा मी मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा मंत्री या ज्या सवयी आहेत या सवयी बंद व्हाव्यात यासाठी मोदीजींनी हा आदर्श समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रदेशाध्यक्ष म्हणाले

• मतदार जेव्हा मताचे कर्ज देतात तेव्हा ते कर्ज कामे करून विकास करून जे परत करतील त्यांनाच देतात, त्यामुळे निवडणुकीत मते मोदींनाच मिळणार.

• आमदार बच्चू कडू यांनी स्वबळाची तयारी करण्याचा अधिकार असून ते एनडीए मध्ये आहेत. त्याचा सन्मान व समाधान करण्यासाठी चर्चा करू .

• कॅग च्या रिपोर्ट अंतिम नसतो, त्यावर सरकार स्पष्टीकरण देते, सरकारचे योग्य स्पष्टिकरण झाल्यास तो रिपोर्ट सुधारित केला जातो.

• १४ राष्ट्रांनी मोदीजींना त्यांच्या देशाचा सर्वाोच्च पुरस्कार प्रदान केला आहे. मोदीजींनी देश जगासमोर मांडला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *