Sadabhau Khot: ‘शाळेमध्ये शेतीचे धडे देण्यापेक्षा शेतमालाला कसा भाव देता येईल याबाबतचे धडे द्या. शेती कशी करावी, बांधावर कसं उभं राहावं, कधी पेरावं हे आमच्या बापाला चांगलं कळतं. ते आमचा बाबा शाळेतले पुस्तक वाचून शिकलेला नाही. शेतकऱ्याचा बाप हाच एक विद्यापीठ असतो. त्या विद्यापीठांमध्ये भलेभले शिकून जातात. मात्र जर तुमचं शिक्षण अपुरं असेल तर आमच्या बापाच्या विद्यापीठामध्ये शिकायला या,’ असा खोचक टोला रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शालेय शिक्षणमंत्री(School Education Ministe) दीपक केसरकर(Dipak Kesarkar) यांना लगावला.(A university is the father of a farmer)
शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन व्यवहारिक शेती केली तर शेतीमधून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते. खरंतर विद्यार्थी जसे घडवू तसे घडतात. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासून कृषीचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दापोलीत केली होती. यावर राज्यभरात चर्चा रंगलेली दिसली काही सकारात्मक तर काही नकारात्मक प्रतिक्रिया देखील याबाबत आल्या आहेत. यावर सदाभाऊ खोत यांनी पुण्यातील साखर संकुल येथे प्रतिक्रिया व्यक्त करताना केसरकर यांच्या निर्णयाचा समाचार घेतला.
सदाभाऊ खोत म्हणाले, ‘केसरकर यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचा अभिनंदन परंतु, त्यांना हे माहिती नाही की शेतकऱ्याचा बाप हाच एक विद्यापीठ असतो. त्या विद्यापीठांमध्ये भलेभले शिकून जातात. मात्र जर तुमचं शिक्षण अपुरं असेल तर आमच्या बापाच्या विद्यापीठामध्ये शिकायला या,’ असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी केसरकर यांना लगावला.