ACP leg slip or suicide attempt?

ACP पाय घसरून पडले की आत्महत्येचा प्रयत्न? : पुणे पोलिस दलात चर्चेला उधाण

पुणे-मुंबई
Spread the love

ACP Sucide Case : पुणे शहर पोलीस(Pune Police) दलातील एका सहाय्यक आयुक्तांनी (ACP) इमारतीतून उडी मारून आत्महत्येचा (Suicide attempt) प्रयत्न केल्याची चर्चा पोलीस दलात सध्या रंगली आहे. गंभीर गुन्हय़ामध्ये वेळेत दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल न केल्याने आरोपींना जामीन मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी (Senior Police Officer) सदर सहाय्यक आयुक्तांची(ACP) कानउघाडणी केली होती. त्यामुळे नैराश्यातून राहत्या घराचा सदनिकेतील गॅलरीतून (Galary) उडी मारून(Jumped) सहाय्यक आयुक्तांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. मात्र, असा काही प्रकार घडला नसून, गॅलरीत पायऱ्यांवर पाय घसरून अपघात घडल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.(ACP leg slip or suicide attempt?)

पुणे शहराच्या मध्यवस्तीत टोळीयुद्धातून तीन महिन्यांपूर्वी एका तरुणाचा खून झाला होता. या गुन्हय़ात सराईतासह साथीदारांविरुद्ध न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नव्हते. परिमंडळ एकमधील एका सहायक पोलीस आयुक्तांकडे गंभीर गुन्हय़ाचा तपास सोपविण्यात आला होता. दोषारोपपत्र वेळेत दाखल न झाल्याने सराईतासह साथीदारांना न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱयांनी सहायक आयुक्तांची कानउघाडणी केली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते नैराश्यात होते. सहायक आयुक्त सोमवारी गॅलरीजवळील पायऱ्यांवर  तोल जाऊन पडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱयांना या घटनेची माहिती दिली.

त्यानंतर पुणे शहर पोलीस दलातील अति वरिष्ठ अधिकारी, दोन पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्तांनी रुग्णालयात धाव घेतली. उपचारासाठी दाखल झालेल्या सहायक आयुक्तांची वरिष्ठ  अधिकाऱयांनी रुग्णालयात भेट घेतली. अधिकाऱ्याला  धीर देऊन वरिष्ठ अधिकाऱयांनी या प्रकाराची कोठेही वाच्यता करू नका, असे सहाय्यक आयुक्तांना सांगितले. दरम्यान, सहायक आयुक्त गॅलरीत पायऱ्यांजवळ  पाय घसरल्याने पडले असून, त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचे वरिष्ठ  अधिकाऱयांनी सांगितले. दरम्यान, गंभीर गुन्हय़ात वेळेत आरोपपत्र दाखल न केल्याने वरिष्ठ अधिकाऱयांनी सहाय्यक आयुक्तांची कानउघाडणी केली. कानउघाडणी केल्यानंतर सहाय्यक आयुक्त मानसिक तणावखाली होते. त्यातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा शहर पोलीस दलात सुरू झाली. वरि÷ अधिकाऱयांनी सहाय्यक आयुक्त गॅलरीत पाय घसरून पडल्याचे सांगून प्रकरण शांत केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *