राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा , राजीनामा : महिनाभरात तिसऱ्या सदस्याचा राजीनाम्याने खळबळ

Laxman Hake Resigned
Laxman Hake Resigned

Laxman Hake Resigned-राज्य मागासवर्ग आयोगाचे आणखी एक सदस्य (Member of State Commission for Backward Classes) लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी अचानक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.  चार दिवसात हा दुसरा तर महिनाभरात तिसऱ्या सदस्याने राजीनामा दिला आहे. यापूर्वी बबनराव तायवाडे(Babanrao Taiwade), संजय सोनवणे(Sanjay Sonawane),  बी. एल. किल्लारीकर (B. L. Killarikar)  आणि आता लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. आयोगाच्या बैठकीत माझ्या आणि आयोगाच्या वैचारिक मतभेदांमुळे व्यथित होऊन आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(Member of State Commission for Backward Classes Laxman Hake Resigned)

मराठा आरक्षणावरून राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आयोगाला पत्र पाठवून मराठा समाजाचे (Marataha Community) सामाजिक मागसलेपण (Social backwardness) सिद्ध करण्याबाबत अभ्यास सुरू करण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्यानुसार आयोगाने काम सुरू केले आहे. आयोगाचे पुण्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. कामाचा व्याप लक्षात घेता आयोगात काम करणे शक्य नसल्याचे सांगत प्रा. डॉ. संजीव सोनावणे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत सर्व समाजांचे सर्वेक्षण करण्याच्या मागणीवरून मतभेद झाल्याने ॲड. बालाजी किल्लारीकर (Adv. Balaji Killarikar) यांनी राजीनामा दिला होता. आता लक्ष्मण हाके यांनी राजीनामा सादर केला आहे.

अधिक वाचा  येणारे दशक हे सहकार क्षेत्राचेच - अमित शहा

हाके हे जून २०२१ पासून आयोगाचे सदस्य होते. राजीनामा पत्रात, “मी, लक्ष्मण सोपान हाके, सदस्य महाराब्ट्र राज्य मागासवर्ग आयोग या पदावर जून २०२२  कार्यरत असून, १ डिसेंबर २०२३ रोजी आयोगाच्या बैठकीमधील माझ्या व आयोगाच्या वैचारिक मतभेदामुळे व्याथित होवून, आज दिनांक ०२ डिसेंबर २०२३ रोजी माझ्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे,”असे हाके यांनी म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love