शिक्षक पत्नीचा खून करून मुलांना विहिरीत टाकले आणि डॉक्टरने स्वत:लाही संपवलं – नक्की काय घडलं?


पुणे- गुरांचा डॉक्टर असलेल्या पत्नीने शिक्षक पत्नीची हत्या करून दोन मुलांना विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे घडली आहे. दरम्यान, पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

वरवंड येथील गंगासगर पार्कमध्ये रूम नंबर २०१ मध्ये राहत्या घरी ही घटना घडली आहे. डॉ.अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२ ) आणि पत्नी पल्लवी (वय ३५) यांचे मृतदेह यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घरी सापडले असून मुलगा अद्वित अतुल दिवेकर (वय ११ ) आणि मुलगी वेदांतिका अतुल दिवेकर (वय ७ ) यांचे मृतदेह विहिरीत आढळले आहेत. विहीर जवळपास १० परस इतकी खोल असून ४५ फूट एवढे पाणी असल्याने मुले वर काढण्यात मोठी अडचण येत असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. डॉ. अतुल दिवेकर हे व्यवसायाने गुरांचे डॉक्टर असून त्यांची पत्नी ही एका शाळेत शिक्षिका असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  बेड न मिळाल्याने कोरोनाबाधित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

या प्रकरणामुळे दौंड तालुक्यातील वरवंड गावात सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही घटना कळताच यवतचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अतुल दिवेकर यांनी आत्महत्या करण्याआधी एक नोट लिहून ठेवल्याची प्राथमिक माहिती आहे. या हत्येमागचं आणि आत्महत्येमागचं कारण अजूनही स्पष्ट नाही आहे. कौटुंबिक वादातून  प्रकार घडला का? किंवा कर्जातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र या संदर्भात कोणतीही ठोस माहिती अजून समोर आली नाही. 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love