पाठ्यपुस्तकांमधून डार्विनचा सिध्दांत वगळल्याच्या बातम्या चुकीच्या – धर्मेंद्र प्रधान

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

पुणे – नव्या शैक्षणिक धोरणाची (New Education Policy) पाठ्यपुस्तके तयार होत आहेत, त्यापैकी इयत्ता पहिली व दुसरीची पुस्तके आली देखील आहेत तर लवकरच इयत्ता तिसरी ते 12 वी पर्यंतची येतील, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (dharmendra Pradhan) यांनी आज येथे केले. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांमधून डार्विनचा सिध्दांत (Darwin’s theory) वगळल्याच्या चूकीच्या बातम्या प्रसिध्द झाल्या असून केवळ दहावीच्या अभ्यासक्रमातून डार्विनच्या सिध्दांताचा काही भाग वगळून तो महाविद्यालयीन अभ्यासक्रमाला जोडण्यात येणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला (Bhandarkar Oriental Research Institute) दिलेल्या सदिच्छा भेटीच्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,(chandrkant Patil) पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत,(pradeep Ravat) संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, (abhay Firodiya) कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, विश्‍वस्त अ‍ॅड. नंदू फडके, राहुल सोलापूरकर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रधान म्हणाले, एनसीईआरटीने (ncert) इयत्ता आठवी आणि नववीच्या पुस्तकात बदल केला नाही तर दहावीच्या पुस्तकातील गेल्या वर्षी डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचा काही भाग वगळला आहे. जो विद्यार्थी दहावीनंतर विज्ञान शिकणार नाही तो डार्विनचा हा ठराविक भाग शिकू शकणार नाही हा मुद्दा रास्त आहे. दहावीमध्ये एक दोन उदाहरणे वगळल्याचे एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे असेही प्रधान म्हणाले.

यावेळी पुढे बोलतांना प्रधान म्हणाले की, भांडारकर संस्था अत्यंत महत्वपूर्ण असे संशोधनात्मक आणि सांस्कृतिक वारसा पुढे नेणारे काम करते आहे. त्यासाठी सर्वप्रकारची मदत केंद्र सरकार करेल. आपल्या देशाच्या प्राचीन वैभवशाली इतिहासाची नोंद आपण घेतली पाहिजे, ज्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. भारतातील सर्वच प्रदेशातील, राज्या-राज्यांमधील प्राचीन मंदिरे, निसर्गसंपदा यांचा अभ्यास केला तर हजारो वर्षांची असलेली परंपरा आपल्याला संपूर्ण विश्‍वाशी जोडता येईल, ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन देखील जागोजागी दिसून येतो.

संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी मंत्रीमहोदयांचे स्वागत केले, त्यावेळी बोलतांना फिरोदिया म्हणाले की, आपल्या देशात समाजाच्या उपासना पध्दती, चालीरिती जरी वेगवेगळ्या असल्या तरी हजारो वर्षांपासून आपल्या देशाचा धर्म एकच होता. दुर्दैवाने परकीय आक्रमणे झाली आणि आपल्या समाजात विषमता निर्माण केली गेली. या संपूर्ण इतिहासाचा आपण बोध घेवून सत्य जाणून घेतले पाहिजे.

अमृता नातू यांनी भांडारकरमध्ये असलेल्या प्राचीन ग्रंथसंपदेची ओळख मान्यवरांना करुन दिली तर चिन्मय भंडारी यांनी संस्थेची समग्र माहिती चित्रफीतीद्वारे यावेळी करुन दिली. स्नेहा सप्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *