पिंपरी(प्रतिनिधि)- नवी सांगवीतील ओम साई ट्रस्ट व नगरसेवक नवनाथ जगताप मित्र परिवार यांच्यावतीने आयोजित श्री साई मंदिराच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते साई चौकातील साईंची व श्री महालक्ष्मी मंदिरात महाआरती करण्यात आली.
साई मंदिराचा वर्धापनदिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोनाच्या घटत्या प्रादुर्भावामुळे यंदा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी नगरसेवक राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, नगरसेविका सीमाताई चौगुले, महालक्ष्मी ट्रस्टचे सेक्रेटरी रावसाहेब चौगुले, अध्यक्ष उद्धव पटेल, नगरसेविका चंदाताई लोखंडे, माजी महापौर शकुंतलाताई धराडे, शामभाऊ जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, तानाजी जवळकर, अमरसिंग आदियाल, श्वेता इंगळे, प्रशांत सपकाळ, सागर परदेशी, अशोक दुर्गुळे, पवन साळुंखे, बाळासाहेब पिल्लेवार, नवी सांगवी, पिंपळे गुरव, जुनी सांगवी परिसरातील साईभक्त नागरिक व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या कार्याची खासदार अमोल कोल्हे यांनी स्तुती केली. तसेच आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन खासदार कोल्हे यांनी केले.
खासदार अमोल कोल्हे येणार असल्याने युवा वर्गात मोठी उत्सुकता होती. त्यामुळे युवा वर्गाने खासदार कोल्हे यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे यांनी, स्वागत व आभार नगरसेवक नवनाथ जगताप यांनी मानले.