एन. ओ. बी. डब्ल्यू.(NOBW) चे जेष्ठ कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक के. टी. खेर्डे उर्फ तात्या खेर्डे यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -बँक ऑफ महाराष्ट्र मधील  एन.ओ. बी.डब्ल्यू जेष्ठ कार्यकर्ते तात्या खेर्डे (केशव त्रिंबक खेर्डे )यांचे सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २२ रोजी पुणे येथील  (बिबवेवाडी,सहकार नगर पुणे) त्यांच्या  राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८० होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित कन्या,एक अविवाहित कन्या होत.

तात्या खेर्डे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व उत्सव व कार्यक्रमात सहभागी असायचे. विजयादशमी संचलनामध्ये संपूर्ण गणवेष मध्ये दरवर्षी न चुकता सहभागी असायचे.एन.ओ.बी डब्ल्यू व भारतीय मजदूर संघ ह्या राष्ट्रीय विचारसरणीच्या संघटनेचे चे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये व अन्य बँकांमध्ये काम वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.विश्व हिंदू परिषेदेचे त्यांनी अनेक वर्षे कार्य केले.

औरंगाबाद येथील सुपारी हनुमान रस्त्यावरील रामेश्वर मंदिरात छोट्या घरात राहून सामाजिक कार्य केले व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या.व सामाजिक कार्य पण अविरतपणे केले.

निर्भीड,बेधडक व आक्रमकता हा त्यांचा स्वभावाचा स्थायीभाव होता.अनेक वर्षे दररोज सकाळी सूर्यनमस्कार व व्यायाम नियमितपणे करीत असत.स्पष्टवक्तेपणा त्यांच्या वागण्यात असल्याने त्याचे काही फायदे व काही तोटे त्यांना झाले होते.पण त्याची चिंता त्यांनी कधी केली नाही.

अनेक दिग्गज मंडळी, महापौर, आमदार,खासदार,तसेच जुन्या पिढीतील सर्व समाजातील कार्यकर्ते, सर्व पक्षाचे नेते रामेश्वर मंदिरातील निवासस्थानी त्यांना भेटत असत व आशीर्वाद घेत असत.गुलमंडी वरील सर्व व्यापारी व कसू पारख मधील नागरिक मंडळी तात्या खेर्डे यांना गुरुजी म्हणत असत व विनम्र अभिवादन करत असत त्यांचे आशीर्वाद घेत असत.त्या काळात शिवजयंती,भागवत सप्ताह,सुपारी हनुमान मंदिर चे कार्यक्रम हनुमान जयंती उत्सव,प्रसाद- वाटप,गोर-गरिबांना मदतकार्य, श्रीकृष्ण जयंती,दही हंडी,गुलमंडी- रंगपंचमी उत्सव,राम- नवमी (कुंभारवाडा) उत्सव,संस्थान गणपती चे सर्व कार्यक्रम आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असे. तात्या खेर्डे यांना भगवान महादेव यांचा रुद्र.तोंडपाठ असायचा दर सोमवारी व श्रावणी सोमवारी रामेश्वर मंदिरात रुद्राभिषेक होत असे त्यांच्याबरोबर एक टीम असायची त्यात कै. रंगराव पारगावकर,कै.पी बी जोशीं,कै नानासाहेब आनंदगावकर,कै. दातार,कै. कोरडे,कै. सारोळकर,कै. मनोहर पोहनेरकर, त्या खड्या आवाजातील मंत्रोच्चार मुळे रामेश्वर मंदिर भक्तिमय व प्रसन्न वातावरण निर्माण करायचे.

सामाजिक समरसतेचा विचार त्यांच्यामध्ये होता व प्रत्यक्ष जीवनात ते अनुभवत असत.त्यांनी हिंदू धर्मातील सर्व समाजातील विवाह इच्छूकांच्या साठी मोफत विवाह जुळवणी केंद्र देखील चालवले.

सर्व समाजातील चालीरीतीची त्यांना माहिती असल्याने कोणत्याही समाजाच्या सामान्यातील सामान्यच्या लोकांना व सदस्यांच्या लग्न- कार्य, विवाह बैठक तसेच सुख दुःख प्रसंगात ते हजेरी लावत असत व मदत करत असत.त्या काळात एखाद्याला अपघात झाल्यास मदत मिळणे फार अवघड असे पण तात्या खेर्डे यांच्या ओळखीने रिक्षा चालक पासून ते घाटी दवाखान्यातील सर्व डॉक्टर्स व स्टाफ पर्यंत रुग्णासाठी सर्वतोपरी मदत करत असत.झोपडपट्टीत राहणाऱ्याच्या घरी जाऊन त्याच्याबरोबर चटणी-भाकरी खात असत.गर्व किंवा अहंकार त्यांना नव्हता.बँकेच्या किंवा शासकीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जातांना कधीही घाबरत नसत.

आयुष्यभर त्यांनी हिंदू संस्कृती जपून आयुष्यभर पारंपरिक वेष पांढरेशुभ्र धोतर (हिरा पन्ना ब्रँड) व गुरुशर्ट घालत होते.घरात सुद्धा स्वच्छता व नीटनेटकेपणा, शिस्त होती.

तात्या खेर्डे यांनी महाराष्ट्र बँकेतील औरंगाबाद च्या विविध शाखेत काम केले निवृत्तीच्या अगोदर ते क्रांती चौक शाखेत काम केले.बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश (मामा ) खेरडे यांचे तात्या मोठे बंधू होते

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *