पुणे–राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सी. एस. आर. फंडातून आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका देण्यात आली.
परमहंस नगर येथील क्रीफ सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दिपेश पिंजरकर, प्रफुल्ल फिसफिसे वस्ती प्रमुख आणि संयोजक विनीत गाडगीळ यांच्या प्रयत्नाने रुग्णवाहिका देण्यात आली. सामाजिक जाणीवेच्या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सी एस आर फंडातून आय सी यू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका देण्यात आली.
कोरोना, आजारी अत्यवस्थ रूग्णोपचार कार्यासाठी तसेच फिरत्या लसीकरण केंद्रासाठी अत्याधुनिक सोईंनी युक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच झाले. यावेळीं जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह विनायक राव डंबीर, जनकल्याण समिती पुणे महानगर कार्यवाह अश्विनी कुमार उपाध्याय, संभाजी नगर कार्यवाह सुधीर जवळेकर परमहंस नगर कार्यवाह अमोद कालगावकर , संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.