सोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर

अर्थ पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- शेतक-यांच्या गरजा समजून घेत उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवून त्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ ठेवून फार्म उपकरणांची निर्मिती करणाऱ्या सोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हा भारतातील सर्वात प्रगत हारवेस्टर २५. ५ लाख रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे. हा स्वयंचलित हार्वेस्टर नेक्स्ट-जेन तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे जो कापणीच्या हंगामा दरम्यान त्रासदायक श्रम कमी करतो इतकेच नाही तर आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असल्याने शेतकऱ्यांसाठी बचत करणारा ठरतो असा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

दरम्यान, सोनालिका कंपनीने हिमाचल प्रदेशातील आंब येथे प्रगत दर्जाची हार्वेस्टर निर्माण सुविधा स्थापन करण्यासाठी २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सोनलिकाची नवीन निर्मिती सुविधा २९ एकरांवर विस्तारली  आहे आणि मल्टी-स्टेज सीईडी सह विकसीत केली गेली आहे .

या १८ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह स्थापित, सीईडी पेंट प्रक्रियेत १४-स्टेज प्रक्रिया समाविष्ट आहे जी हारवेस्टरची गंज-मुक्त आणि दीर्घ कालीन कामगिरी सुनिश्चित करते.

प्रोजेक्टर हेडलाइट्ससारख्या आधुनिक वैशिष्ट्यांसह सोनालिका सम्राट परिपूर्ण आहे. शेतकऱ्यांसाठी दीर्घकाळ चालणारे आकर्षक टेल-लॅम्प, आरामदायक आसन व्यवस्था आणि सोईनुसार हलवता येणारे स्टीयरिंग. त्याचे पॉवर पॅक्ड डिझेल इंजिन जे २,२०० आरपीएमवर १०१ एचपी पॉवर तयार करते आणि हळुवार ऑपरेशनसाठी जोडलेले ५ -स्पीड कॉन्स्टंट मेश गियरबॉक्स.  स्थिरतेसाठी सर्वात लांब फीडर असेंब्लीसह फिट केलेली ४ फीडर चेन यंत्रणा आहे .सुलभ देखभालसाठी सोनालिका सम्राट मध्ये हेवी ड्यूटी बीयरिंग आहे. जेणेकरून शेतकऱ्याची उत्पादकता वाढविण्यासाठी मदत होते.

नवीन बेंचमार्क तयार सोनालिका नवीन हारवेस्टर पीक उत्पादन वाढवते  आणि गुणवत्तेचा ऱ्हास टाळून पिकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान कमी करण्यात मदत करते . सोनालिका सम्राट कापणी, मळणी आणि चाळणी यासारख्या सुविधा देते. गहू, भात, जव, सोयाबीन, सूर्यफूल, मोहरी, हिरव्या आणि काळ्या हरभऱ्याच्या कापणीच्या वेळी ऑपरेशनमध्ये शेतक-यांना सहजतेने जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याच्या कामगिरीसाठी  सोनालीकाने हार्वेस्टर तयार केले आहे असाही दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *