श्रेष्ठदानात पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद : दीड महिन्यात साडेदहा हजार रक्तपिशव्यांचे संकलन

आरोग्य पुणे-मुंबई
Spread the love

पुणे – दानात सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदान गणले जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रक्ताची विशेष गरज लक्षात घेऊन ‘समर्थ भारत व जनकल्याण रक्तपेढी’च्या विद्यमाने शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित रक्तदान शिबिरास पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दीड महिन्यात सुमारे १० हजार ५२८ रक्तपिशव्यांचे संकलन झाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पुणेकरांनी अनुभवली आहे. यामुळे १ मे पासून लसीकरणाला महत्त्व देण्यात आले. लसीकरणानंतर रक्ताचा तुटवटा निर्माण व्हायला नको, यासाठी समर्थ भारतच्या विद्यमाने पुणे महानगरात विविध ठिकाणी १ एप्रिल ते १५ मे या दरम्यान विविध सामाजिक संस्था, संघटना, गणेश मंडळे, शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला पुणेकरांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण शंभर शिबिरे घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात एकशे दहा शिबिरे पार पडली. शिबिरासाठी एकूण १५ हजार ३४७ स्त्री-पुरुषांनी नोंद केली होती. या शिबिरात मातृशक्ती आणि  युवा शक्तीचा सहभाग उल्लेखनीय  होता.

या भागात झाली शिबिरे

कात्रज, आंबेगाव, पूर्व हवेली, हडपसर, वडगावशेरी, येरवडा, विद्यापीठ, औंध, बाणेर, बावधन, सिंहगड रोड, सहकारनगर, पर्वती, कोथरूड, कर्वेनगर, कसबा, कॅम्प परिसर, महादजी शिंदे, वानवडी, धनकवडी, बिबवेवाडी, धायरी, वडगाव, नारायण पेठ, प्रभात रोड, गोखले नगर, डेक्कन, सनसिटी, आयडीयल कॉलनी, वारजे, लोणीकाळभोर.

एकूण रक्तपिशवी संकलन – १०५२८

सहभागी रक्तपेढी – २०

सहभागी संस्था

सामाजिक – ९८

शिक्षण – १०

विविध राजकीय पक्ष – ३

रक्तदानाचा परिणाम

– महानगरातील रक्तसाठा जवळपास २.५ ते ३ पट वाढला.

– पुणे शहरातून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत भंडारा, जालना, मुंबई व इतर ठिकाणी रक्तपुरवठा

श्रेष्ठ दानात आपली सामाजिक जबाबदारी पुणेकरांनी लीलया पेलली

लसीकरणा दरम्यान येणारी  रक्त तुटवडा अडचण लक्षात घेऊन रक्तपेढींच्या आवाहनानुसार समर्थ भारतच्यावतीने समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी व्यापक स्तरावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध गणेश मंडळे, ज्ञाती संस्था, शिक्षण संस्था सहभागी झाले होते. पुणे महानगरात एकूण शंभर रक्तदान शिबिरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात ११० शिबिरे पार पडली. पुणेकरांनी सर्व ठिकाणी शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रेष्ठ दानात आपली सामाजिक जबाबदारी पुणेकरांनी लीलया पेलली आहे अशा भावना  समर्थ भारत, पुणे महानगरचे संयोजक, महेश मानेकर यांनी व्यक्त केल्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *