वंध्यत्वावर मात करण्यासाठी ओएसिस फर्टिलिटीची ‘चुप्पीतोडो मोहीम’


पुणे- राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह २०२३ व ओऍसिस फर्टीलिटीच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त, ओएसिस फर्टिलिटी, पुणेद्वारे वंध्यत्वाविषयीचा कलंक मोडून काढण्यासाठी आणि जोडप्यांना त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्यांवर खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी “चुप्पी तोडो” ही जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ओऍसिस फर्टीलिटीचे क्लिनिकल हेड डॉ. नीलेश उन्मेश बलकवडे, संगीतकार सलील कुलकर्णी  पीसीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ वर्षा डांगे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नलिनी बलकवडे यांच्या हस्ते या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.  

“चुप्पीतोडो”(मोकळा संवाद करेल वंध्यत्वावर मात) मोहिमेच्या अंतर्गत ओएसिस फर्टिलिटी, पुणे द्वारे वंध्यत्वाविषयीचा कलंक मोडून काढण्यासाठी आणि जोडप्यांना त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्यांवर खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यात येते तसेच येणाऱ्या रुग्णांना मोफत मार्गदर्शन करण्यात येते आणि ट्रीटमेंटमधील पहिली सोनोग्राफी हि मोफत स्वरूपात करण्यात येते. वंध्यत्वामुळे अनेक स्त्रिया ह्या नैराश्येत जातात त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केले जाते.

अधिक वाचा  अतिवृष्टीचा इशारा : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर

“चुप्पीतोडो”मोहिमेच्या अंतर्गत मार्फत वंध्यत्वाबद्दलची जनजागृती व गुणवत्तापुर्ण उपचार देण्याचा ओऍसिस फर्टीलिटीचा मानस आहे.जनजागृतीच्या माध्यमातून आयव्हीएफ हे तंत्रज्ञान जनमाणसांपर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे .जनजागृतीच्या माध्यमातून ओऍसिस  पुणे आणि पुणे परिसरातील शिरूर , राजगुरुनगर , लोणावळा , इंदापूर  या भागात वंध्यत्व आणि त्याच्या उपचार पद्धती याविषयी मोफत मोहीम राबवण्यात येतात .

ओॲसिस फर्टिलिटी क्लिनिक च्या माध्यमातून १००० हून अधिक जोडप्यांना त्यांचे कुटुंब तयार करण्यात मदत करण्यात आली आहे. प्रजनन तज्ञ, उत्कृष्ट भ्रूणशास्त्रज्ञ, जागतिक दर्जाच्या इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) लॅब आणि अद्ययावत उपकरणांच्या अत्यंत चांगल्या टीमसह सेन्टरने महाराष्ट्रातील अनेकांना पालकत्वाचा आनंद भेट दिला आहे.

वंध्यत्वावर मात करीत पालकत्व मिळण्यासाठी उपचार आणि प्रक्रिया ओऍसिस फर्टीलिटी हे जोडप्यांना पुरवते. इलेक्ट्रॉनिक विटनेसिंग सिस्टीम (इडब्सल्यूएस) बीज शुक्राणू तसेच गर्भाचे शीत संरक्षण हे अद्यावत तंत्रज्ञान येथे उपलब्ध आहे. फर्टिलिटी प्रिझर्व्हेशन टेक्नॉलॉजी, कर्करोगाच्या रुग्णांना कर्करोगाच्या उपचारापूर्वी त्यांची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच त्यांना त्यांच्या सोयीनुसार भविष्यात गर्भधारणा करण्यास सक्षम करते. अनुवांशिक दोष निवारणासाठी प्रीप्लांटेशन आनुवंशिक चाचणी (पीजीटी-ए)  प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग) हे आणखी एक प्रगत तंत्र आहे हे मुलांना पालकांकडून होणाऱ्या आनुवंशिक विकारांचे हस्तांतर रोखण्यास मदत करते.

अधिक वाचा  गायक रविराज नासेरी यांच्या भजन,अभंग,सूफी गाणी आणि गझल गायनाने रसिक तृप्त

“चुप्पीतोडो”या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ओएसिस फर्टिलिटीचे क्लिनिकल हेड डॉ निलेश बलकवडे म्हणाले,- “गेल्या ३ वर्षांत, आम्ही प्रगत आणि उच्च वैयक्तिक प्रजनन उपचारांद्वारे हजारो जोडप्यांना पालकत्वाचा आनंद देऊ शकलो आहोत. जोडप्यांना अनेक वर्षानंतरही गर्भधारणा होऊ न शकल्यास प्रजननक्षमतेसाठी वैदयकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, आम्ही शुक्राणूंची संख्या कमी असलेल्या पुरुषांना देखील पितृत्व प्राप्त करण्यास मदत करतो. बरेच लोक त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्यांबद्दल बोलत नाहीत कारण आजही वंध्यत्व निषिद्ध मानले जाते. आम्ही आमच्या  चुप्पीतोडो”मोहिमेद्वारे ही मानसिकता मोडून काढू इच्छितो”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love