आयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध

तंत्रज्ञान शिक्षण
Spread the love

पुणे  :  टाटा स्काय या भारतातील कंटेंट डिस्ट्रिब्युशन आणि पे टीव्ही व्यासपीठाने वेदांतू या लाईव्ह ऑनलाइन लर्निंगमधील संस्थेच्या साह्याने आज एका नाविन्यपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहे. यातून भारतभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे .खर्च, अंतर आणि वेळ अशा शिक्षण घेण्यातील सर्वसाधारण अडचणी दूर करत या व्यासपीठावर टाटा स्काय जेईई प्रेप आणि टाटा स्काय नीट प्रेप या लिनिअर सेवा सादर करण्यात आल्या आहेत. यात ९ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना फाऊंडेशन पातळीची तयारी  आणि ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना जेईई मेन, जेईई अँडव्हान्स आणि नीट या कोअर सिलॅबसची तयारी करण्यासाठी साह्य केले जाईल.

दररोज ५ रुपये अशा दरात सर्वोत्कृष्ट वेदांतूच्या मास्टर टीचर्सकडून हा अभ्यास शिकवला जाईल. शिकवण्यातील सुयोग्य रेकॉर्ड असणाऱ्या आयआयटी आणि एम्सच्या शिक्षकांचाही यात समावेश आहे. यात इंग्रजी आणि हिंदी अशा एकत्रित स्वरुपात शिकवले जाणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.  . कंटेंट सहज उपलब्ध व्हावा यासाठी ही सेवा टाटा स्काय मोबाइल अँपवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना बिंज पद्धतीने हवे तेव्हा शिकता येईल, तसेच बॅच  देखील रिपीट करता येणार आहे; आणि सिलॅबस रिव्हिजन, परीक्षा, क्लास नोट असा सगळा कंटेट ऑन-डिमांड उपलब्ध होईल. विद्यार्थी इथे प्रश्न, शंका विचारू शकतील आणि वेदांतूच्या तज्ज्ञ मास्टर्स टीचर्सकडून त्यांची उत्तरे मिळवू शकतील. या सेवेत उपलब्ध परीक्षा तयारीसाठीचे मटेरिअल ही अँपच्या माध्यमातून मिळवता येईल.

या भागीदारीमुळे टाटा स्कायच्या सबस्क्राईबर्सना वेदांतूच्या लाईव्ह लर्निंग प्रोग्राम्सवर खास डिस्काऊंट मिळणार आहे. यात १२ वीसाठीच्या कोर्सेस सोबतच इतर स्पर्धा परीक्षा, सीबीएसई/आयसीएसई/राज्य बोर्ड आणि इतर अनेक विषयांचा समावेश आहे .सबस्क्राईबर्सना लाईव्ह क्लासेस, अभ्यासक्रम, कोर्स रिव्हिजन मटेरिअल इत्यादींचा अँकसेस या ऑफरमुळे मिळणार आहे. विद्यार्थ्यांना मजेशीर पद्धतीने आणि गुंतवून ठेवणारा शैक्षणिक अनुभव देतानाच या क्लासमध्ये इंटरअॅक्टिव्ह क्विझही असतील. विद्यार्थ्यांना टीव्ही रिमोटचा वापर करून ही उत्तरे देता येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या दोन सेवांमध्ये परीक्षांच्या तयारीसाठी फाऊंडेशन आणि कोअर लेसनवर भर दिला जाणार आहे.

जुलै २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात इयत्ता ९ वी आणि १० वी साठी ४४० हून अधिक व्हिडीओज तर ११ आणि १२ वी साठी २१०० हून अधिक व्हिडीओमधून हा अभ्यासक्रम उपलब्ध असेल. तसेच जानेवारी २०२२ पासून सर्वसमावेशक रीव्हिजन सेशन्सही सुरू होतील. यात क्लास नोट्स, तयारीसाठीचे मटेरिअल आणि टेस्ट सीरिजसह वेदांतूचे स्टडी सेंटर असेल. हे सगळे टाटा स्काय मोबाइल अॅपच्या माध्यमातून उपलब्ध असेल. टाटा स्काय जेईई प्रेप आणि टाटा स्काय नीट प्रेपमधून दरी भरून काढत सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ५१८ वर टाटा स्काय नीट मिळवण्यासाठी ८८९१०८८९१० आणि ५१७ वर टाटा स्काय जेईई प्रेप मिळवण्यासाठी सबस्क्राईबर्सना ८४६००४८४६०४ या नंबर वर मिस्ड कॉल देता येईल. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *