आषाढी वारीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार – अजित पवार


पुणे—कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही आषाढी वारी होण्याची शक्यता नसल्याचे संगितले जात आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असली तर  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता बघता राज्य शासन वारीला परवानगी देईल असे वाटत आहे. मात्र, वारकऱ्यांनी यंदा 500 लोकांनी वारी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, आज पालखी सोहळ्याचे मान्यवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारकऱ्यांच्या या भावना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात येतील आणि तेव्हाच वारीबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

यंदा 14 जूनला पालखी सोहळ्याचे पहिले प्रस्थान आहे. वारकरी संस्थांनी एकत्रित निवेदन सरकारला दिले आहे. त्यामध्ये त्यांनी यावर्षी ५०० लोकांना वारी करायची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे, अंशतः: संचारबंदी लावा, लसीकरण करा,बाकी कोरोना संबंधीचे नियम पाळायला आम्ही तयार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांना महापालिकेचा दणका: रुग्णांना दिले सव्वातीन कोटी रुपये परत मिळवून

पुण्यात अजित पवारांनी श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी (दि.28) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. पवार म्हणाले, वारकरी संप्रदायाकडून पायी वारीची मागणीचा आग्रह धरला जात आहे. मात्र,आजही महाराष्ट्रात १८ जिल्हे असे आहेत की तिथे पॅाझिटिव्हची संख्या जास्त आहे. त्यात ती साताऱ्यात जास्त आहे. त्यांचे म्हणणे की आम्ही इतरांना येवु देणार नाही. वारकरी संप्रदाय जे म्हणते ते करतो.पण वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.

पहिल्या लाटेपेक्षा गंभीर परिस्थिती गंभीर आहे.आम्हाला लॉक डाऊन लावण्यात किंवा पालखी सोहळा बंद ठेवण्याची हौस नाही. पण दुसरा पर्याय उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील हावसे गवसे यांची संख्या मोठी असते. तसेच पालखी सोहळ्यादरम्यान रोज टेस्टिंग केले आणि तरी कोरोना संख्या आढळली तर पालखी थांबवता येणार नाही.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love