Drug mafia Lalit Patil case : ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना अटक होणार?

The then Dean of Sassoon Hospital Dr. Sanjeev Thakur will be arrested?
The then Dean of Sassoon Hospital Dr. Sanjeev Thakur will be arrested?

Drug mafia Lalit Patil case —ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात(Drug mafia Lalit Patil case ) ससून रुग्णालयाचे(Sasoon Hospital)  तत्कालीन अधिष्ठाता (Dean)  डॉ. संजीव ठाकूर(Dr. Sanjeev Thakur ) यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र(charge sheet) दाखल करून त्यांना अटक (Arrest) करण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून(Pune Police) राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे (State Medical Education Department)  मागण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून तसे पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर करण्यात आलं आहे. (Dean of Sassoon Hospital Dr. Sanjeev Thakur will be arrested?)

ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत डॉ. ठाकूर हे दोषी आढळल्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय विभागाला पत्र पाठवले आहे. डॉक्टर ठाकूर यांनी ललित पाटीलवर(Lalit Patil) उपचार करण्याच्या नावाखाली त्याचा ससून रुग्णालयातील मुक्काम जास्तीत जास्त वाढेल यासाठी मदत केल्याचं पोलिसांना चौकशीत आढळून आले आहे. त्याचबरोबर ललित पाटीलला त्याच्या टोळीसह ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट (Drug Racket)  चालवताना अटक केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्याची पित्ताशयाची शस्त्रक्रिया(Gallbladder surgery) करण्याचा निर्णय डॉक्टर संजीव ठाकूर यांनीच घेतल्याच निष्पन्न झालं आहे. या शस्त्रक्रियेसाठी ‘एक्स रे’ (x-Ray) काढताना ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता.

अधिक वाचा  #96 kg of ganja seized: रुग्णवाहिकेतून गांजाची वाहतूक : 96 किलो गांजासह १ कोटी ३१ लाख ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

ललित पाटील पळून गेल्यानंतर या प्रकरणात अनेकांवर संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणी कारागृहातील कर्मचाऱ्यालादेखील अटक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याने ललित पाटीलला त्यांच्या भावासोबत बोलण्यासाठी मोबाईल फोन दिल्याचं समोर आलं होतं. तसेच त्यावेळी ससून रुग्णालयात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

डॉ. संजीव ठाकूर यांच्यावरही सुरुवातीपासून संशय व्यक्त केला जात आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर संजीव ठाकूर यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं होतं आणि काही दिवस त्यांनी पुण्याच्या बाहेर असल्याचं माध्यमांना सांगितलं होतं. मात्र ज्यावेळी पुण्याची कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर ससून रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आणि ललित पाटील प्रकरणाची माहिती घेण्यासाठी घेण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना डॉ. ठाकूर यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली होती. त्यानंतर धंगेकरांनी संजीव ठाकूर यांना सगळी माहिती मागितली असता ही माहिती देण्यस देखीस टाळाटाळ केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आमदार धंगेकरांनी सातत्याने हा विषय लावून धरत डॉ. ठाकूर यांच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान, संजीव ठाकूर यांची चौकशी केली असता ते दोषी आढळून आले. त्यांनी ललित पाटीलला आश्रय दिल्याचं पोलिसांच्या चौकशीत आढळून आलं आहे. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यात आली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love