अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दलच प्रेम आहे का? – चंद्रकांत पाटील


पुणे- औरंगाबाद शहराचे नामांतर हा मुळात आमच्यासाठी राजकीय विषय नाही. तर तो श्रद्धेचा विषय आहे, असे सांगत अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दलच प्रेम आहे का, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे उपस्थित केला.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून सध्या शिवसेना व काँग्रेसमध्ये जुंपली आहे. औरंगाबादचे नाव बदलण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शविला असून, नावे बदलून विकासाचे प्रश्न सुटतात का, असा सवाल सेनेला केला आहे. या पार्श्वभूमीवर या वादात आता भाजपानेही उडी घेतली आहे. यासंदर्भात चंद्रकांतदादा म्हणाले, सेनेला औरंगाबादचे नामांतर हवे आहे. तर काँग्रेसला ते नको आहे. आम्हाला या दोघांत पडायचे नाही. मात्र, स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सर्वप्रथम औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे आता सेनेने काय ते करून दाखवावे. काँग्रेसचा संभाजीमहाराजांच्या नावाला विरोध आहे काय? समजा असेल, तर औरंगजेबाचे नाव तरी कशाला हवे? अजूनही देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का, असा प्रश्न पडतो.

अधिक वाचा  नारायण राणे, राज ठाकरे, छगन भुजबळ गेले तरी शिवसेनेला काही फरक पडला नाही

‘सामना’च्या भाषेबद्दल रश्मीताईंना पत्र देणार

मागे मी औरंगाबादमध्ये गेलो होतो, तेव्हा मी संभाजीनगर नाव व्हावे, हीच भूमिका मांडली होती. त्या वेळी सामनामध्ये माझ्यावर टीका करण्यात आली होती. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर अशीच भाषा वापरण्यात येत आहे. यासंदर्भात आपण लवकरच संपादक या नात्याने रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहोत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल बोलताना मुंबईवर दिल्लीचेही लक्ष राहील, असे त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love