राजा उदार नाही, उधार झाला आणि हाती भोपळा आला- देवेंद्र फडणवीस


पुणे- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते म्हणून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळले पाहिजे अशी घोषणा केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यापेक्षा वरचढ निघाले व त्यांनी बागायतदारांना दीडलाख रुपये मदत मिळाली पाहिजे असे सांगितले. परंतु अद्याप शेतकऱ्यांना कोणतीच नुकसान भरपाई राज्यसरकारने दिली नसून राजा उदार नाही उधार झाला आणि हाती भोपळा आला…अशी परिस्थिती राज्यसरकारची निर्माण झाली असून प्रामाणिक शेतकऱ्यांना ठेंगा दाखविण्याचे काम सरकारने केले असल्याची टिका विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. 

मांजरी बुद्रुक येथील शेतकरी संवाद यात्रा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, आमदार सिध्दार्थ शिरोळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, बाबुराव पाचर्णे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक आदी उपस्थित होते. 

अधिक वाचा  पंजाब - हरियाणाच्या शेतकऱ्यांना हे सांगूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही -शरद पवार

यावेळी फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना सहा हजार, आठ हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली परंतु शेतकऱ्याला मुर्ख बनविण्याचे काम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले आहे. स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणातात आणि आम्ही केलेल्या कर्जमाफीला नावे ठेवतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, आमचे योजनेत 42 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला मात्र, सध्या तो केवळ 29 लाख शेतकऱ्यांनाच झाला आहे. सरकार मध्ये शेतकऱ्यांचे बाजूने बोलणारे कोणी नाही, त्यांना विचारणारे कोणी नाही. अतिवृष्टी, पीकरोग, दुष्काळ अशा प्रत्येकवेळी आम्ही शेतकऱ्यांना मदत दिली. शेतकरी ज्यावेळी संकटात येर्इल तेव्हा खंबीरपणे त्यांचे पाठीशी आम्ही उभे राहिलो.  परंतु, सध्याचे सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकून पाहण्यास ही तयार नाही. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love