#भंडारा दुर्घटना: दोषींना कडक शासन करू, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही-अजित पवार


पुणे- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात केयर युनिटमध्ये नी (NICU) शनिवारी मध्यरात्री आग  लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भंडारा येथील दुर्घटनेची नवजात बालकांच्या मृत्यूची घडलेली घटना दुर्दैवी असून या घटनेचे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दगावदेल्या मुलांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची मदत देण्यात येईल तसेच  नवजात बालक ठेवण्यात आली आहेत, अशा सर्व एनआयसीयूचे ऑडिट करण्यात येईल आणि या प्रकरणातील दोषींना कडक शासन करू कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही,अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात केयर युनिटमध्ये NICU मध्ये एकूण 17 नवजात बालके होती. या विभागामध्ये आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बॉर्नमधील सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला.

अधिक वाचा  शिवभोजन थाळी ठरली निराधारांसाठी वरदान..

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, भंडारा येथील घटना दु:खद आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये नवबालक आहे त्या सर्व हॉस्पिटलचे ऑडिट करण्यात येईल. सतत ऑन ड्यूटी कोणीतरी हवे. ही धक्कादायक घटना आहे. वेदना होत आहेत. आईवडिलांना दु;ख सावरता यावे म्हणून प्रार्थना करतो. दोषींना कडक शासन करू मुलाहिजा ठेवणार नाही. जास्तीची माहिती घेत आहे.राजेश टोपेंना तिथे जायला सांगितले आहे.

या घटनेबाबत विरोधी पक्षाचे नेते सरकारवर आरोप करत आहेत. यावर बोलताना कोणी काय वक्तव्य करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु त्या ठिकाणी घडलेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर यामध्ये नक्की काय घडले, हे समजू शकेल. परंतु त्यांनी दिलेल्या माहितीवरती नक्कीच विचार केला जाईल, असे पवार यावेळी म्हणाले. त्या एनआयसीयूमध्ये 24 तास कर्मचारी असणे आवश्यक होते. भंडारा येथील बालकांच्या मृत्यूच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहितीही अजित पवारांनी दिली. मृत बालकांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love