माजीआमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल


पुणे–कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्दयशस्त्रक्रिया झालेल्या नागरिकास लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्यासह एका महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षवर्धन रायभान जाधव (वय ४३, रा. बालेवाडी) आणि इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमन अजय चड्डा (वय २८, रा. बोपोडी) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रोडवर संघवीनगर येथे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

अधिक वाचा  महसूल खात्यातील बड्या आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच स्वीकारताना रांगेहाथ पकडले : सीबीआयची कारवाई

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. सध्या ते मनसेमध्ये आहेत. तसंच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई म्हणूनही त्यांची ओळख आहे.

तक्रारदार चड्डा यांचे आई-वडील सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन औंधवरुन संघवी नगरकडे निघाले होते. त्यावेळी जाधव यांनी आपल्या चारचाकीचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे अपघात झाला. त्यावरुन चड्डा यांच्या वडिलांनी जाधव यांना जाब विचारला. त्यावेळी आरोपींनी चड्डा यांच्या आई आणि वडिल्यांच्या छातीवर आणि पोटावर लाथा मारल्या. आपलं हृदयाचं ऑपरेशन झाल्याचं चड्डा यांच्या वडिलांनी सांगितल्यानंतरही मारहाण सुरुच ठेवल्याचा आरोप अमन चड्डा यांनी केला आहे.दोघांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जिवीतास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या जखमी दाम्पत्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दहीफळे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love