माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जमीन अर्ज फेटाळला


पुणे–ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी कन्नडचे माजी आमदार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव (वय-43) यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने शुक्रवारी त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. दरम्यान, आज त्यांचा जामीन अर्ज नायालयाने फेटाळला.

14 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता औंध येथील एका बँकेसमोर घडली. फिर्यादी यांचे आई-वडील सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून औंध वरुन जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या जाधव यांच्या मोटारीचा दरवाजा अचानक उघडला आणि चड्डा दांपत्य दरवाज्याच्या धक्क्याने खाली पडले. त्यानंतर झालेल्या वादानंतर जाधव यांनी दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केलीया आरोपाखाली हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली होती. त्यांना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रावरी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने  न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज त्यांचे वकील झहीर खान यांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला होता परंतु तो न्यायालयने फेटाळला.

अधिक वाचा  #हीट अँड रन’ प्रकरण : अग्रवाल कुटुंबियांविरोधात आणखी एक तक्रार दाखल होणार : ८४ लाख रुपये न दिल्याने मुलाची आत्महत्या : तक्रारदाराचा आरोप

दरम्यान, हा मोठा गुन्हा आहे, असे न्यायाधीशांचे म्हणणे आहे. त्यामुळे जामीन देण्यात आला नाही. आम्ही सोमवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहोत, अशी माहिती यावेळी बचाव पक्षाचे वकील झहीर खान यांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love