हिंमत असेल,तर त्यांनी आमच्याशी एकेकटय़ाने लढावे -चंद्रकांत पाटील


पुणे-पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निकालांबाबत आश्चर्यकारक काहीही नाही. तिघे-तिघे मिळून एकटय़ाशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळे चित्र दिसणार नव्हते. या पक्षांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी आमच्याशी एकेकटय़ाने लढावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे आघाडीच्या नेत्यांना दिले.

पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, पुणे व नागपूर हे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांदादा म्हणाले, तीन पक्ष एका बाजूला व आम्ही एका बाजूला अशी लढत झाली. तरीही आम्ही निकराने लढलो. निकाल आश्चर्यकारक नाहीत. पुण्यात मते खाणारा तिसरा ताकदीचा उमेदवार नसल्यामुळे भाजपला फटका बसला. त्याचबरोबर शिवसेनेने या निकालांतून काय तो बोध घ्यायला हवा. यात फायदा राष्ट्रवादीचा झाला.

अधिक वाचा  प्रिया बेर्डे पाठोपाठ आता ही अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे, मराठवाडा पदवीधरची जागा राष्ट्रवादीने जिंकली. अमरावती शिक्षक मतदारसंघ अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादीकडे राहणार आहे. कारण, तिथे पहिल्या क्रमांकावर असलेले उमेदवार अनिल देशमुख यांचे मेहुणे आहेत. ते राष्ट्रवादीतच जातील. काँग्रेसने नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक मतदारसंघ जिंकला. यात शिवसेनेला काय मिळाले?. काँग्रेस, राष्ट्रवादी आपली संघटना वाढवत असून, शिवसेनेचे मात्र खच्चीकरण होत आहे. हे मी जुन्या प्रेमातून सांगत आहे. शिवसेनेला चुचकारण्याचा वा सरकार बनविण्याचा यात कोणताही हेतू नसल्याचे चंद्रकांतदादांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love