महाविकास आघाडीने एकत्रित काम केल्याचा आणि सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय -शरद पवार

आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलवावी
आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलवावी

पुणे- महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचा निकाल हा महाविकास आघाडीने एकत्रित काम केल्याचा आणि महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय आहे अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे.

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या होमपिचवर महाविकास आघाडीने धोबीपछाड करत नागपूरच्या पदवीधर मतदार संघात भाजपचा पराभव केला आहे. याबाबत बोलताना पवार म्हणाले, नागपूरच्या जागेवर गेली अनेक वर्षे आम्हाला कधीच यश मिळालं नव्हतं, गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे ही जागा अनेक वर्षे होती तरी सुद्धा काँग्रेसला यश मिळते हे महाविकास आघाडीचे यश आहे.  यापूर्वीच्या लोकांना ज्यांना आजपर्यत जनतेन स्वीकारलं होत त्यापेक्षा वेगळा निर्णय लोकांनी यावेळी घेतला त्याचा हा परिणाम आहे.

अधिक वाचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या साथीदाराचे संबंध कसाबशी - किरीट सोमय्या

दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघाचा निकाल पाहता महाराष्ट्राचे चित्र बदलते आहे असेही पवार म्हणाले.  या बदलला महाराष्ट्राच्या जनतेचा पाठींबा आहे या सर्व विजयी उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो असे त्यांनी नमूद केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love