अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यातही गुन्हा दाखल


पुणे(प्रतिनिधी)—खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल केलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते  यांच्याविरोधात पुण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यसभा  अमर रामचंद्र पवार यांनी याप्रकरणीतक्रार दाखल केली असून सदावर्ते यांच्यावर कलम 153(ब) नुसार गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.   

 खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत अफजलाच्या औलादी आणि अफजलाच्या वृत्तीचे….. मी असल्या छत्रपती गाद्यांना मानत नाही असे वक्तव्य सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. त्यावरून ही तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. त्यानंतर आज अखेर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी काल नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दखल करण्यात आला होता.

अधिक वाचा  प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

 मराठा समाजाचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशजांचा एकेरी उल्लेख करुन सकल मराठा समाजाचा अपमान होईल. तसेच जाती-पातीमध्ये तेढ निर्माण होऊन दंगली भडकतील, सार्वजनिक शांततेचा भंग होईल, अशी वादग्रस्त विधाने सदावर्ते यांनी केली आहेत. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने अमर रामचंद्र पवार यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love