#हीट अँड रन प्रकरण : अल्पवयीन मुलाचे ‘ब्लड सॅम्पल’च बदलले : ससूनच्या दोन डॉक्टरांना बेड्या

Two Sassoon Doctors Arrested
Two Sassoon Doctors Arrested

पुणे(प्रतिनिधि)-पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मद्यधुंद नशेत पोर्शे कार चालवून दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला उडवून देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचे ‘रक्ताचे नमुनेच’ (ब्लड सॅम्पल’) बदलण्यात आले आहेत. याप्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरनोळ   यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी या दोघांना सोमवारी पहाटे बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी सकाळी वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करून घेतली. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ससूनमध्ये त्यावेळी ड्युटीवर असलेले सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी हे रक्ताचे नमुने बदलल्याचे समोर आले आहे. रक्ताचे नमुनेच बदलल्यामुळे रक्त तपासणी अहवाल (ब्लड रिपोर्ट) बदलला गेला. थेट रक्तच बदलल्यामुळे या प्रकरणाची दिशाच बदलण्याची शक्यता होती.

असा झाला उघड झाला हा प्रकार

सुदैवाने पोलिसांनी दुसऱ्यांदा त्या मुलाचे ब्लड सॅम्पल घेऊन ठेवलेले होते आणि त्याची डीएनए चाचणी देखील करण्यात आली आहे. यातून हा सर्व प्रकार उघड झाला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी संध्याकाळी कारवाईचे सविस्तर नियोजन  केलं आणि डॉ. तावरे व डॉ. हळनोर  या दोघांना पहाटे त्यांच्या घरामधून अटक केली. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा  रत्नागिरी हापूस मार्केट यार्डात दाखल : पाच डझनाच्या एका पेटीस ३१ हजार दर

अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल दिले फेकून

दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत माहिती देताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ३०४  मधील गुन्ह्यात आता १२० ब अंतर्गत, ४६०, २१३, २१४  हे कलम लावण्यात आले आहेत. १९ मेला जे अल्पवयीन तरुणाचे ब्लड सँपल आले ते दुसऱ्याचे ब्लड सँपल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जो अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता त्याचे ब्लड सँपल ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घेतले आणि डस्टबिनमध्ये टाकले. त्याजागी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घतले आणि त्यावर अल्पवयीन आरोपीचं नाव लिहून हे त्याच्या रक्ताचे नमुने आहेत असं भासवत ते पुढे तपासणीसाठी पाठवण्यात आले. फॉरेन्सिक लॅबचे सीएमओ डॉ. श्रीहरी हळनोर यांनी हे सगळे ब्लड सँपल घेतले आणि बदलले. त्यांना काल ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली असता डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन हे करण्यात आल्याचं समोर आलं आहे, असं आयुक्तांनी सांगितलं.

अधिक वाचा  एमआयटी एडीटी विद्यापीठात 'टॅलेंट फ्यूजन' उत्साहात

दोन्ही रक्ताचे नमुने वेगवेगळ्या व्य़क्तीचे

कुठलीही शंका राहू नये, म्हणून रात्री अल्पवयीन आरोपीचं दुसरा ब्लड सँपल औंध येथील रुग्णालयात घेण्यात आलं होतं. ससूनमध्ये जे ब्लड सँपल गेले ते आरोपीचेच आहे की नाही हे तपासण्यासाठी हे दुसरे सँपल घेण्यात आले होते. काल आम्हाला जे रिपोर्ट प्राप्त झाले, त्यानुसार, औंधला दिलेलं सँपल हे आरोपीचं होतं, ते त्याच्या वडिलांच्या ब्लड सँपलशी मॅच झालं. पण, ससूनचं सँपल हे अल्पवयीनचं नव्हतं, हे स्पष्ट झालं. त्यानंतर डॉक्टरांना ताब्यात घेऊन चौकशी केली मग त्यांना आज सकाळी अटक करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितल.

दरम्यान, दोन्ही आरोपी डॉक्टरांना आज( सोमवार) न्यायालयासमोर  हजर करुन पोलिस कोठडी मागणार, तसेच ते ब्लड सँपल कोणाचे होते याचाही शोध लावला जाईल. ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकणात गुन्हेगारी कट, फसवणूक, पुरावे नष्ट करणे या अनुषंगाने कलम लावण्यात आले आहेत. डॉक्टरांविरोधात भक्कम, कायदेशीर तांत्रिक पुरावा आमच्याकडे आहे, असेही अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे इव्हीएम मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा.. - अजित पवार

असे फुटले डॉक्टरांचे बिंग

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला रविवारी वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखविले. डॉ.अजय तावरे हे ससुन रुग्णालयाच्या forensic medicine and toxicology चे प्रमुख आहेत तर डॉक्टर श्रीहरी हरनोळ हे अपघात विभागात चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. त्या मुलाचे ब्लड सँपल श्रीहरी हरनोळ यांच्या विभागानं घेतले. मात्र त्यामध्ये दारूचा अंश येऊ शकतो हे लक्षात आल्यावर ते बदलायचे ठरवले. त्यासाठी रजेवर असलेल्या डॉक्टर अजय तावरे यांनी हस्तक्षेप केला. डॉक्टर अजय तावरे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. मात्र तरीही तावरे यांनी ब्लड सॅंपल बदलायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच एका रुग्णाचे ब्लड सॅंपल तपासणीसाठी देण्यात आले. मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लॅबला पाठवून डीएनए चाचणी करायचं ठरवलं आणि डॉक्टरांचं बिंग फुटलं.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love