पुणे—कोरोनाच्या संकटामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून १२ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांसाठी बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षांसाठी बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांसाठी प्रश्नसंच तयार करण्याचे कामही सुरू आहे. दरम्यान, एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापिकेन अंतिम वर्ष आणि पदव्युत्तर पदवी द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या प्रश्नसंचातील काही प्रश्न व्हॉट्सअॅपद्वारे पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे.
या परीक्षेचे स्वरूप विद्यार्थ्यांना कळण्यासाठी ६ ते १० ऑक्टोबर दरम्यान सराव चाचण्यांची सुविधा देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. बहुपर्यायी प्रश्नपत्रिके साठी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ सदस्यांकडून प्रत्येक विषयाचे वेगवेगळे प्रश्नसंच तयार केले जाणार आहेत. त्यातील काही प्रश्न व्हॉट्सअॅपद्वारे पाठवल्याचा आले आहेत. विशेष म्हणजे संबंधित प्राध्यापिके चा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाशी संबंध नसतानाही हा प्रकार झाला आहे.दरम्यान, परीक्षांसाठी प्रश्नसंच तयार करण्याचे काम अजून सुरू आहे. व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले गेलेले प्रश्न अंतिम प्रश्नासंचातून वगळले जातील. अंतिम वर्षांच्या परीक्षा अतिशय काळजीपूर्वक कोणताही गैरप्रकार होणार नाही, असे मराठी अभ्यास मंडळाचे प्रमुख डॉ. शिरीष लांडगे यांनी म्हटले आहे.