सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांचा आरखडा तयार – कशा घेणार परीक्षा?

शिक्षण
Spread the love

पुणे– सर्वोच्च नायालायाच्या निर्णयानंतर विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे ही परीक्षा बहु पर्यायी प्रश्न पद्धतीने होणार आहे. दरम्यान, या परीक्षेचा आराखडा तयार करण्यात आला असून विद्यार्थ्यांना ही परीक्षा अवघड जाऊ नये म्हणून ६० प्रश्नांपैकी ४० टक्के सोपे, ४० टक्के मध्यम तर उर्वरित २० टक्के प्रश्न अवघड असणार आहेत. विद्यापीठाने परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळेतच ही परीक्षा घेतली जाणार आहे.विद्यापीठाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात हे माहिती देण्यात आली आहे.

अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग राहिले आहेत त्यांची परीक्षा १ ऑक्टोबर पासून सुरु होईल. तर नियमित परीक्षा १० ऑक्टोबरला सुरु होणार आहे. ही परीक्षा एका तासाची आणि ५० गुणांची असेल. विद्यार्थ्यांना ६० प्रश्न दिले जाणार असून, ५० अचूक प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ‘एमसीक्यू’मुळेपरीक्षेमुळे कमी गुण मिळतील किंवा अनुत्तीर्ण होईल अशी भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा सोपी जावी यासाठी ४० टक्के सोपे, ४० टक्के अवघड आणि २० टक्के कठीण प्रश्न असणार आहेत.

ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळच्या परीक्षा केंद्रांवर सुरक्षेचे सर्व नियम पळून, ऑप्टीकल मार्क रेक्ग्नायझेशन (ओएमआर) शीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यावरून एमसीक्यू प्रश्न सोडवायचे आहेत., असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

  • जे विद्यार्थी ऑफलाईन, ऑनलाईन परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यांच्यासाठी नंतर स्वतंत्र परीक्षेचे आयोजन अंतिम वर्षाच्या किंवा सत्राच्या परीक्षांसाठी १३ मार्च पर्यंत करण्यात येईल.
  • शिकवलेल्या अभ्यासक्रमावr परीक्षा अंतिम पूर्व वर्षाच्या किंवा सत्राच्या परीक्षा १०० टक्के अभ्यासकारामावर असतील.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी २० मिनिटे जास्तीचा वेळ दिला जाईल.
  • ऑफलाईन व ऑनलाईन एमसीक्यू परीक्षेमुळे उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत व पुनर्मुल्यांकानाची प्रत मिळणार नाही.
  • अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरीय अभ्यासक्रमनिहाय समन्वयकांची नियुक्ती करण्यात येईल.
  • परीक्षेचे वेळापत्रक www.unipune.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

यंदा मात्र पहिल्यांदाच कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेची छायांकित प्रत दिली जाणार नाही. पुनर्मूल्यांकनही करता येणार नाही, त्यामुळे आता अंतिम वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी तयारीनिशी परीक्षेला सामोरे जाणे गरजेचे आहे. परीक्षेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.पुणे विद्यापीठाने परीक्षेचे अंतिम वेळापत्रक केले जाहीर

1 ते 9 ऑक्टोबरला बॅकलॉग विषयांची होणार परीक्षानियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा 10 ते 30 ऑक्टोबर दरम्यान यंदा 2 लाख 48 हजार विद्यार्थी देणार परीक्षापरीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार60 मार्कांचा बहुपर्यायी (एमसीक्यू) असणार पेपर 50 प्रश्नांची द्यावी लागणार अचूक उत्तरं ऑफलाइन परीक्षा घेतली जाणार ओएम आर सीटवरती ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक बिघाड झाल्यास वेळ वाढवून दिला जाणार दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार 20 मिनिटांचा जास्त वेळ परीक्षेसाठी छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची नसेल सुविधा

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *