रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितल्या या 9 गोष्टी


दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसते आहे. देशात कोविड १९ चा संसर्ग  होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एका दिवसात 90-95  हजारांहून अधिक कोरोना संक्रमणाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. देशात आतापर्यंत 47 लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे, तर त्यातून मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही 78  हजारांच्या पुढे गेली आहे. हे टाळण्यासाठी, मास्क घालणे, साबणाने हात धुणे, लोकांपासून योग्य अंतर ठेवणे इ. जगभरातील सरकारे आणि वैज्ञानिकांनी विविध प्रकारचे सल्ला दिले आहेत.

ही सर्व काळजी घ्यायची तर आहेच परंतु कोरोना टाळण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली  रोग प्रतिकारशक्ती (immunity) मजबूत करणे. देशात कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहेच परंतु, पुण्यात आणि देशाच्या विविध भागात केल्या गेलेल्या सिरो सर्व्हे मध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की अशा लोकांची संख्या मोठी आहे ज्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला परंतु त्यांना कळलेच नाही.  हे का होऊ शकले तर हे त्यांच्यामधील मजबूत रोग प्रतिकारशक्तीमुळे . रोग प्रतिकार शक्ती मजबूत असेल तर ती कोरोनाच्या विषाणुशी लढाई करून त्याचा खात्मा करते.  

अधिक वाचा  गुड न्यूज- मुंबईत दोन आठवड्यात तर राज्यात दोन महिन्यात कोरोना नियंत्रणात येणार?

आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) आयुष मंत्रालयाच्या (ayush Miministry) माध्यमातून आपली  रोग प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या वस्तूंचे सेवन करण्यास सांगितले आहे. या कुठल्या वस्तू आहेत  ज्याने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतील याबाबत जाणून घेऊ या.

 दररोज एक कप (१५० मि.ली.) आयुष काढा घ्या

आयुष मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष काढा घेण्याचा उपयोग होऊ शकतो. तुळशीची पाने आणि दालचिनी सारख्या घरातील वस्तूंचा वापर करून हा काढा तयार करता येईल.

संशमनी वटी (दिवसातून दोनदा, 500 मीग्रॅ)

कोणत्याही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानामध्ये ही वटी आपल्याला उपलब्ध होईल. यातील दोन गोळ्या सकाळी आणि दोन गोळ्या संध्याकाळी घ्याव्यात. संशमनी वटी संसर्ग होण्यापासून लढा देण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.    

गुळवेल पावडर (Giloy) (गरम पाण्यात दररोज १-३ ग्रॅम १५ दिवस)

गुळवेल पावडर रोग प्रतिकारशक्ती बूस्टर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण मानले जाते. त्याचे सेवन केल्याने शरीरास रोगांविरुद्ध लढण्याची ताकद मिळते.

अधिक वाचा  राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार : महाआरोग्य शिबिराचे अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

अश्वगंधा (दिवसातून दोनदा, 500 मिली.ग्रॅ)

अश्वगंधा एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती मानली जाते. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त आहे. अश्वगंधाचा शतकानुशतके भारतात वापर केला जात आहे.

अश्वगंधा पावडर (दिवसातून दोनदा- 1-3 ग्रॅम, दररोज १५ दिवस)

अश्वगंधा कॅप्सूल प्रमाणे, अश्वगंधा पावडर देखील कोणत्याही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात उपलब्ध आहे. कॅप्सूल नसेल तर अश्वगंधा पावडरचे आपण वर सांगितलेल्या मात्रेत देवाण करून  आपली रोग प्रतिकारशक्ती वाढऊ शकतो.

आवळा किंवा आवळा पावडर (दररोज १- ग्रॅम)

आवळा किंवा आवळा पावडर बाजारात सहज मिळतात.  त्यात भरपूर व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे.

कोरडा खोकला (Dry Cough)झाल्यास जेष्ठमध पावडर (दिवसातून दोनदा गरम पाण्यात १-३ ग्रॅम)

जेष्ठमध हा औषधी गुणधर्मांचा खजिना मानला जातो. त्याचे बरेच फायदे आहेत,  कोरोना कालावधीत त्याचा वापर केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. आचार्य बालकृष्णांच्या मते,  जेष्ठमधाचे सेवन केल्याने  खोकला किंवा कोरडा खोकला दूर होतो.

अधिक वाचा  नॅनो कर्क्यूमिनच्या वापरातून मुखाच्या कर्करोगावरील परिणामकारक उपचार शक्य

सकाळी आणि संध्याकाळी हळदीयुक्त गरम दूध

आजीच्या घरगुती उपचारांमध्ये हळदीच्या दुधाला महत्वाचे स्थान आहे. त्याचे आपल्या शरीरास अनेक फायदे आहेत. त्याबरोबरच रोग प्रतिकार शक्तीही त्याने वाढते. तुम्हालाही कोरोनाशी लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती बळकट करावी असे वाटत असेल हळदीयुक्त दुधाचे सेवन जरूर करा.

हळद आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

कोरोनाच्या लक्षणांमध्ये घसा खवखवणे देखील समाविष्ट आहे. म्हणून जागरुक राहण्याची गरज आहे. आपल्याला घशात खवखव झाल्यासारखे वाटत असल्यास,  एका ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा हळद आणि थोडे मीठ घाला त्या कोमट पाण्याने दिवसातून 5-6 वेळा घशातून कराव्यात. यामुळे घशात खवखवल्यापासून आराम मिळेल.

दररोज एक चमचा च्यवनप्राश खा

अलीकडील संशोधनात हे सिद्ध झाले आहे की जे लोक च्यवनप्राश खातात ते कमी आजारी पडतात. हे रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे अन्न मानले जाते. म्हणून दररोज एक चमचा च्यवनप्राश खा, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती बळकट होईल.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love