जास्त काढा पिणे यकृतासाठी हानिकारक? काय म्हणते आयुष मंत्रालय?

आरोग्य राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाचे संकट सुरु झाल्यापासून कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जात आहेत. त्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती बळकट ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कमकुवत प्रतिकार असलेल्या व्यक्तीला कोविड-१९ ची लवकर बाधा होऊ शकते असेही सांगितले जाते. मग ही प्रतिकार शक्ती कशी वाढवायची यासाठी अनेक उपाय सांगितले जात आहेत. त्यात प्रामुख्याने बहुतेक घरांमध्ये एका गोष्टीचा सर्वजण अवलंब करत आहेत, ती म्हणजे आयुर्वेदिक काढा. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आयुर्वेदिक काढा घेणे हा देखील आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. तथापि, गेल्या काही दिवसांपासून, सोशल मिडीया आणि इतर माध्यमातून पसरवले जात आहे की म्हणजे काढ्याचे जास्त प्रमाणात सेवन हानिकारक होऊ शकते. जास्त काढा पिण्याने विशेषत: यकृतासाठी हानिकारक होऊ शकते असे सांगितले जात आहे. त्यामुळे अगोदरच कोरोनाच्या संकटाने ग्रासलेल्या लोकांची मनात आणखी एक भीती निर्माण झाली आहे. परंतु, काढा पिण्याचा सल्ला देणारे आयुष मंत्रालयाने मात्र, याबाबतच्या प्रश्नांचे खंडन केले आहे. काय म्हटले आहे आयुष मंत्रालयाने ते जाणून घेऊ या.

आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की,काढा पिण्यामुळे शरीराचे कोणतेही नुकसान होत नाही. मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की,  काढा पिण्यामुळे शरीर स्वास्थ्य चांगले राहते आणि शरीर निरोगी होते. आयुर्वेदिक काढ्याचे सेवन कोणीहीकरू शकते. जर एखाद्या व्यक्तीला काढ्याच्या सेवनाने त्रास होत असेल तर, अशा व्यक्तीला कदाचित अगोदरपासून यकृताची समस्या असू शकते. काढ्यामुळे नुकसान हे कुठल्या वस्तू वापरून तुम्ही काढा बनवला आहे आणि तो किती प्रमाणात तुम्ही घेता या गोष्टींवर अवलंबून आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आयुष मंत्रालयाने प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच  काढा पिणे, हळदीचे दूध पिणे, च्यवनप्राश घेणे इत्यादी उपाय सुचविले होते. आयुर्वेदानुसार,  काढ्यामध्ये वापरलेले मसाल्याचे पदार्थहे औषधांसारखे असतात, जी निरोगी शरीरासाठी निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे.  

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की, काढा पील्याने यकृताचे कोणतेही नुकसान झाल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. आयुष मंत्रालयाला तुळस, काळी मिरी, दालचिनी, आले आणि मनुका वापरून काढा तयार करण्याचा सल्ला देण्यात आला होता. तसेच, काढा दिवसातून दोनदा सेवन करण्यास सांगितले आहे.

वैद्य कोटेचा म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीने ही पद्धत लक्षात ठेवून काढ्याचे सेवन केले तर त्याला यकृताचा त्रास होऊ शकत नाही. नियमानुसार,  काढ्याचे सेवन करा जेणेकरून आपले शरीर निरोगी राहील  आणि कोरोना विषाणूच्या संसर्गापासून संरक्षणही होईल असा सल्ला त्यांनी दिला आहे. काढ्यामध्ये वापरल्या जाणारे पदार्थ हे नैसर्गिक आहेत आणि ते स्वयंपाकासाठी भारतीय समाजात नियमितपणे वापरले जातात.

कोटेचा पुढे म्हणाले की कोविड -१९ साथीच्या रोगामध्ये काढ्याचा नेमका परिणाम जाणून घेण्यासाठी  संशोधन चालू आहे. ही आता सर्वांना माहिती आहे की कोरोना विषाणू प्रथम आपल्या श्वसन प्रणालीवर आक्रमण करतो आणि काढा घेतल्याने आपली श्वसन प्रणाली मजबूत होते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते.

 घरीच बनवू शकतो आपणा हा काढा

चार तुळशीची पाने, एक लवंग, थोडी दालचिनी आणि आले 5-10 ग्रॅम घ्या. ते एकत्र ठेचून घ्या आणि ते   दीड कप पाण्यात उकळवा आणि एक कप शिल्लक राहिल्यावर आपण त्यात मध घालून प्यावे. ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी काढ्यामध्ये साखर किंवा मध मिसळू नये. आयुष मंत्रालयाच्या वेबसाईटवर याबाबत अधिक तपशीलवार माहिती दिली आहे. तीही आपण वाचू शकतो.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *