न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीची किंमत दिली नाही


मुंबई – अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्या प्रकरणावरून सुरु असलेलं राजकीय युध्द सुरूच आहे. गुरुवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश सर्वोच्च नायालयाने दिल्यानंतर न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीची किंमत दिली नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते राम कदम यांनी ट्विट करून दिली आहे.

सुशांत सिंह याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे द्यावा अशी मागणी त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आली होती. बॉलीवूडमधील  काही कलाकारांनीही ही मागणी केली होती. त्याबाबत आज सर्वोच्च नायालयात सुनावणी झाली. राज्य पोलिसांकडून नित तपास होत नसल्याचा आरोप केला जात होता. तर महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य मार्गाने सुरु असल्याचे राज्य सरकारकडून सांगितले जात होते. सर्वोच्च नायालयाने मात्र, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला आहे.

अधिक वाचा  राजकीय फायदा नसल्याने आमच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिले जात नाही का?

यासंद्रभात आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सीबीआयची टीम उद्या मुंबईत येऊन सुशांतच्या घराची तपासणी करणार आहे. त्यानंतर सीबीआय मुंबई पोलीसांनाही भेटणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.  

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देशभरातून या संदर्भात प्रतिक्रिया येत आहेत.“न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीची किंमत दिली नाही,” अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

 सुशांत सिंह राजपुतचे चाहते, कुटुंबीयं अनेक जण त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत होते. सरकार अहंकारामुळे आपल्या भूमिकेवर अडून राहिलं. त्यांनी मुंबई पोलिसांनाही योग्यरित्या काम करू दिलं नाही. त्यांच्या कामात अनेकदा अडथळा निर्माण केला, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  भंगाराच्या दुकानातून ११०५ काडतुसं जप्त :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी गुन्हे शाखेची मोठी कारवाई

सरकारनं सुशांतच्या कोट्यवधी चाहत्यांचा, त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान केला. एका मोठ्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्यासारखी सरकारची भूमिका होती. आता जो काही निर्णय असेल तो न्याय देणारा असेल, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही या प्रकरणावरुन ठाकरे हल्लाबोल केला आहे. निरुपम यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास कुठेतरी कमी पडत होता.हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनवू नका, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करा. सुशांत सिंग राजपूत मृत्यू तपास सीबीआयकडे सोपवावा. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कोणालाही संशय नाही. परंतु या प्रकरणाचा तपास कमी पडत होता. हे दिसूनही येत होता, त्याचे कारण सरकारला माहिती आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love